Mira Jagannath Instagram
मनोरंजन

Mira Jagannath:'जेव्हा पण मी तुला पाहते..', अभिनेत्री मीरा जगन्नाथच्या फोटोवरील 'त्या' मुलीच्या कमेंटनं उडाली खळबळ

मीरानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यावर एका मुलीनं कमेंट करत आपलं अभिनेत्रीवरचं प्रेम व्यक्त केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mira Jagannath: अभिनेत्री मीरा जगन्नाथला मालिकेतील तिच्या भूमिकांमुळे जेवढी प्रसिद्धी मिळाली नसेल तेवढी प्रसिद्धी तिला बिग बॉस मराठीमुळे मिळाली आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या भागात ती सामिल झाली होती. या भागात तिला तिखट मिरची हे उपनाव मांजरेकरांनी दिलं आणि बघता बघता ते नाव मीराला प्रसिद्ध करून गेलं.

मीरा जगन्नाथचं चिडणं,रागावणं,फटकन बोलणं अशा अनेक कारणांनी तिला हे नाव दिलं गेलं होतं. बिग बॉस मराठीच्या दरम्यान तिचं नाव जय दुधाणे सोबतही जोडलं गेलं होतं. त्यावेळी त्यांच्यातील घनिष्ट मैत्रीनं लोकांना तसा विचार करायला भाग पाडलं होतं.

आता बिग बॉस नंतर दोघांच्या एकत्रित अल्बमनं देखील सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. कारण काही दिवसांपूर्वी त्यांची एकत्रित अशी दोन गाणी लोकांच्या भेटीस आली. 'जीव रंगलाय गो..'असं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्याचे नाव आहे.(Mira Jagannath marathi actress female fan comment on actress) photo

सध्या मीरा जगन्नाथ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिनं आपल्या निवांत क्षणाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत खरंतर ती खूप सुंदर दिसते आहे. आणि तिच्या अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. यातील एका तरुणीच्या कमेंटनं मात्र सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. असं काय म्हणाली आहे ती युवती? चला जाणून घेऊया.

तसं पाहिलं तर सेलिब्रिटींच्या फोटोंवर नेहमीच भन्नाट कमेंट्स पहायला मिळतात. अनेकदा सेलिबच्या पोस्टपेक्षा त्यावरील कमेंट चर्चेत येतात.

मीराच्या फोटोला पाहून तिच्या एका फिमेल चाहतीनं लिहिलं आहे,'मीरा सगळेजण बोलतात की प्रेम हे फक्त एकदाच होते पण जेव्हा पण मी तुला पाहते तेव्हा तुला बघताना मला तुझ्यावर प्रेम होऊन जातं गं..माझ्या इन्स्टा स्टोरीमध्ये रोज तू असतेस..सगळेजण आता मला तुझ्या नावाने चिडवतात मीरा मीरा..'

आता एका मुलीनं अशी कमेंट केल्यानं सोशल मीडियावर मात्र वेगळ्याच चर्चेला तोंड फुटलं आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की स्वतः मीरानं खूश होत त्या तरुणीच्या कमेंटवर रिअॅक्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

SCROLL FOR NEXT