Mira Rajput with her kids Misha &zain Google
मनोरंजन

शाहिद कपूरच्या लहानग्यांनी असा साजरा केला प्रजासत्ताक दिन;सविस्तर वाचा

सकाळी लवकर उठून टी.व्ही वर परेड पाहत राष्ट्रगीतही गायले;मीरा राजपूतने दिली माहिती

प्रणाली मोरे

शाहिद कपूरनं(Shahid Kapoor) आई-वडिलांच्या संमतीने रीतसर अरेंज्ड मॅरेज केलं ते दिल्लीच्या मीरा राजपूतशी(Mira Rajput). त्या दोघांच्या कुटुंबाचे अध्यात्मिक गुरू एक. त्यामुळे सत्संगाच्या निमित्तानं यांची कुटुंब अनेकदा भेटायची त्यातूनच शाहिदसाठी मीराच योग्य असं पंकज कपूर यांना वाटले अन् त्यांनी आपल्या मुलाचे लग्न तिच्याशी लावून दिले. मीरा आणि शाहिदमध्ये वयाचं तेरा वर्षाचं अंतर असूनही ती खूप समजूतदार आहे असं अभिनेत्याने अनेकदा आपल्या मुलाखतींच्या माध्यमातून सांगितले आहे. पण खरंतर त्या दोघांच्या लग्नानंतर मीराने अनेकदा तिच्या वागणुकीतून,पोस्टच्या माध्यमातून आपल्या समजूतदारपणाची झलक दिलीच आहे. मीरा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

ती अनेकदा आपल्या नवऱ्यासोबतचे,मुलांसोबतचे फोटो,व्हिडीओ पोस्ट करीत असते. पण मेकअप संदर्भातल्याही टीप्स देणाऱ्या तिच्या पोस्ट चाहत्यांची वाहवा मिळवतात. मीरानं स्वतःला बॉलीवूडच्या लॅमलाइटपासून व्यवस्थित लांब ठेवलं आहे. ती तिचा फॅमिली टाईम व्यवस्थित एन्जॉय करताना दिसते. आज प्रजासत्ताक दिनीही तिने आपल्या मुलांविषयी,स्वतःच्या बालपणाविषयीच्या काही खास गोष्टी सांगणारी पोस्ट शेअर केली आहे. तिनं त्या पोस्टमध्ये बालपणी प्रजासत्ताक दिन ती कसा साजरा करायची आणि आज आपण आपल्या मुलांकडे तो गुणांचा वारसा कसा सुपूर्द केला आहे याविषयी लिहिले आहे. आज भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन.

आज अनेक सेलिब्रिटींनी प्रजासत्ताक दिनाविषयीच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. मीरा राजपूतनेही सकाळी प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा आनंद मुलांसोबत कसा घेतला हे सांगताना टी.व्ही स्क्रीनवर सुरू असलेल्या परेडचा फोटो शेअर केला आहे. या दिवशी आर्मीत असलेल्या आपल्या आजोबांची खूप आठवण येत आहे असंही ती म्हणाली. ती लहान असताना आजोबा कसे यादिवशी त्यांना सकाळी उठवायचे आणि परेड पहायला टी.व्ही समोर बसवायचे आणि तो शिरस्ता आपण आजतागायत पाळत आहोत असंही तिनं पोस्टमध्ये लिहिलं आहे. मिशा आणि झेनने आपल्यासोबतच सकाळी लवकर उठून प्रजासत्ताक दिनाची परेड पाहत राष्ट्रगीतही म्हटले अशीही माहिती मीरानं त्या पोस्टमध्ये लिहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी बिजबेहरा येथील जाबलीपुरा फळ बाजारात फळ उत्पादकांच्या आंदोलनात सहभाग घेतला

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT