mirzapur 2 
मनोरंजन

अली फजल आणि पंकज त्रिपाठी स्टारर 'मिर्झापुर २' लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीला

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सिनेमाघरं बंद असल्या कारणाने सध्या सगळ्या प्रेक्षकांचा मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म वरील सगळ्यात लोकप्रिय वेबसिरीजपैकी एक असलेली वेब सिरीज म्हणजे 'मिर्झापुर'. 'मिर्झापुर'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरंच या वेबसिरीज दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणारे. होय. अभिनेता अली फजल आणि पंकज त्रिपाठी स्टारर ही लोकप्रिय वेबसिरीज पुढच्याच महिन्यात रिलीज होणार आहे.   

भारतीय प्रेक्षकांमध्ये 'सॅक्रेड गॅम्स' आणि 'मिर्झापुर' या दोन वेबसिरीज मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाल्या होत्या. प्रेक्षक कित्येक दिवसांपासून 'मिर्झापुर'च्या पुढच्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. ऍमेझॉन प्राईमची ही 'मिर्झापुर २' वेबसिरीज एप्रिल २०२० मध्ये रिलीज होणार होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्याची रिलीज टाळली गेली. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही वेबसिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केली जाईल. या महिन्याच्या शेवटपर्यंत याबाबतची संपूर्ण माहिती समोर येईल. या वेबसिरीजच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरु असल्याची चर्चा आहे. 

'मिर्झापुर'ची कहाणी उत्तर प्रदेशमधील अंडरग्राऊंड माफियावर आधारित आहे. ज्यामध्यो दोन गटात अक्षरशः रक्ताची होळी खेळली जाते. या वेबसिरीजमधील पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा आणि हर्षिता गौर यांच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं गेलं आहे.   

mirzapur 2 starring pankaj tripathi and ali fazal to premiere in the last week of september  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT