mirzapur third seson coming soon amazon announced  esakal
मनोरंजन

Mirzapur 3: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, ' कोणत्याही परिस्थितीत...'

ओटीटी विश्वामध्ये आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केलेल्या मिर्झापूरनं प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली होती.

सकाळ डिजिटल टीम

Mirzapur 3 Web serise: ओटीटी विश्वामध्ये आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केलेल्या मिर्झापूरनं प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली होती. या मालिकेच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. कालिनभैय्या फेम पंकज त्रिपाठी यांच्या भूमिकेनं तर प्रेक्षकांना वेड लावले. या मालिकेची तिसरा सीझन केव्हा प्रदर्शित होणार असा सवाल प्रेक्षकांकडून विचारला जात होता. मात्र यासगळ्यावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून मिर्झापूरवरुन वाद सुरु होता.

क्राईम वेब सीरिजमध्ये मिर्झापूरचे नाव नेहमीच सर्वात आधी घेतले जाते. सेक्रेड गेम्स या मालिकेला मागे टाकण्यात मिर्झापुरनं बाजी मारली आहे. त्यातील कंटेट, पात्रं, त्यांचा अभिनय, डायलॉग हे सारं प्रेक्षकांना प्रभावित करुन गेलं आहे. त्यामुळे त्याच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी पसंत केलं. त्याच्य़ावर कौतूकाचा वर्षावही केला. आता तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. यावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे की, मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनवर बंदी घालता येणार नाही. किंवा त्याचे प्रदर्शन रोखता येणार नाही. काही दिवसांपूर्वी या मालिकेवर बंदी घाला, त्याचे प्रदर्शन होऊ देऊ नका अशा आशयाची याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक यांचे धाबे दणाणले होते. यावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानं चाहत्यांनी, प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. वेबसीरिजसाठी प्री स्क्रिनिंग समिती कशी काय असू शकते, असा सवाल न्यायालयानं विचारला होता.

कोर्टानं एका गोष्टीबाबत आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणजे, ज्यावेळी एखादी मालिका ही ऑनलाईन प्रदर्शित होते तेव्हा त्याच्यासाठी एखादी प्री स्क्रिनिंग कमिटी कशी काय असू शकते, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय उमेश ललित आणि बेला एम त्रिवेदी यांनी मिर्झापूरमध्ये राहणाऱ्या सुजीत कुमार सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय दिला आहे. अशातच त्या याचिकाकर्त्याला आपली याचिका मागे घेण्याचा आदेश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT