MIss India 2022 Sini Shetty trolled,whats reason behind that? Instagram
मनोरंजन

Miss India 2022 सिनी शेट्टीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, आता केलं जातंय ट्रोल

मिस इंडिया खिताब जिंकल्यानंतर सिनी शेट्टीचे अनेक जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र एका व्हिडीओमुळे तिला ट्रोल केलं जात आहे.

प्रणाली मोरे

'फेमिना मिस इंडिया २०२२'(Miss India 2022) चा खिताब कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं(SIni Shetty) जिंकला अन् तिच्यावर कौतुकाचा वर्षावही सुरु झाला. पण मग असं काय घडलं की लगेचच तिला ट्रोलही केलं जात आहे. सिनी शेट्टीचे काही जुने व्हिडीओ तिनं मिस इंडिया खिताब जिंकल्यावर जोरदार व्हायरल झाले. त्यातील काही तिचे डान्सिंग व्हिडीओ देखील होते. सिनीचा त्यातील एक व्हिडीओ जो सोशल मीडियावर शेअर केला गेला,ज्यात ती डान्स करताना दिसतेय ते पाहून आता तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.(MIss India 2022 Sini Shetty trolled,whats reason behind that?)

मिस इंडिया २०२२ सिनी शेट्टीच्या त्या व्हायरल झालेल्या डान्सिंग व्हिडीओत ती पांढऱ्या रंगाच्या लेहंग्यात डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिला की वाटतं तो खूप आधीचा म्हणजे जुना व्हिडीओ आहे. या व्हिडीओत सिनी खूप छान डान्स करताना दिसत आहे. पण याला पाहिल्यानंतर काही लोकांनी खूप घाणेरड्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं लिहिलं आहे,'ही तर एकदम नॉर्मल मुलीसारखी दिसते आहे. हिच्यात मिस इंडिया बनण्यासारखं वेगळं काय आहे'. तर काहींनी सिनीची तुलना दिशा पटानीसोबत करत तिच्या लूकला नावं ठेवली आहेत.

२१ वर्षीय सिनी शेट्टीने मिस इंडिया २०२२ चा खिताब आपल्या नावावर केला आहे. सिनीनं तब्बल ३१ सौंदर्यवतीनं मागे टाकत,हा मिस इंडिया स्पर्धेचा मानाचा ताज पटकवला आहे. सिनी शेट्टी ही कर्नाटकी राहणारी असली तरी तिचा जन्म आणि शिक्षण हे मुंबईचं. मुंबईतील सेंट डोमिनिक सावियो शाळेत तिनं शालेय शिक्षण संपादन केलं आहे. त्यानंतर सोमैय्या कॉलेजमधून डिग्री संपादन करुन तिनं अकाउंट आणि फायनान्सचा देखील कोर्स केला आहे. सध्या ती चार्टर्ड अकाउंटचा देखील कोर्स करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT