harnaaz sandhu  google
मनोरंजन

Harnaaz sandhu : पोलिसांच्या कुटुंबियांसोबत नाचली मिस युनिव्हर्स हरनाझ संधू..

नुकताच 'मिस युनिव्हर्स' चा किताब मिळवणारी हरनाझ संधू 'आयटीबीपी' पोलिसांच्या कुटुंबियांसह नाचताना दिसली. त्यासंदर्भातील व्हिडीओ 'आयटीबीपी'कडून पोस्ट करण्यात आला आहे.

नीलेश अडसूळ

जागतिक स्तरावर महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मिस युनिव्हर्सचा किताब मिळवणारी हरनाझ संधू (harnaaz sandhu) गेल्या काही दिवसात चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. तिच्या या विजयाने देशाची मान अभिमानाने उंचावली असून ती सध्या भारतातील नोएडामध्ये आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) ग्रेटर नोएडामध्ये आयोजित केलेल्या महिला सक्षमीकरणाच्या खास कार्यक्रमात तिने हजेरी लावली होती. यावेळी हरनाझने आयटीबीपी पोलिसांचे, त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.

या कार्यक्रमानंतर पोलिसांचे कुटुंबीय पंजाबी गाण्यांच्या तालावर थिरकत होते. यावेळी हरनाझ संधू देखील त्यांच्या आनंदात सामील झाली. याचा एक सुंदर व्हिडीओ आयटीबीपीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. ज्यामध्ये मिस युनिव्हर्स हरनाज संधू पोलिसांच्या कुटुंबियांसोबत धमाल करताना दिसत आहे. पंजाबी गाण्यांवर संधू आणि पोलिसांचे कुटुंबीय दिलखुलासपणे नाचत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करताना आयटीबीपीने लिहिले आहे, 'मिस युनिव्हर्स २०२१ हरनाज कौर संधू आज महिला सक्षमीकरण आणि 'एचडब्ल्यूडब्ल्यूए' च्या स्थापना दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात ३९ व्या बटालियन आयटीबीपी ग्रेटर नोएडा येथे उपस्थित राहिली तसेच पोलिसांच्या कुटुंबियांच्या आनंदात ती सहभागी झाली,'

देशाच्या बर्फाळ सीमेवर तैनात असलेले आयटीबीपीचे जवान कठीण प्रसंगांना कसे तोंड देतात याविषयी हरनाझ भरभरून बोलली. तसेच महिला सक्षमीकरणावरही तिने भाष्य केले, अशी माहिती काही माध्यमांनी दिली आहे. संधूच्या या कामगिरीवर चाहते अत्यंत खुश असून प्रतिक्रिया आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT