भारती सिंग या दिवशी होणार आई, म्हणाली कधीही येऊ शकतं बाळ...

प्रेग्नन्सीमधील शेवटच्या काही दिवसांचा आनंद घेताना भारती सिंगने फोटो शेअर केले आहेत. भारतीने त्यासाठी खास फोटोशूट केले असून, आई होण्यासाठी आता शेवटचे काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे तिने सांगितले आहे.
bharati singh
bharati singh goog;e

Entertainment news : प्रसिद्ध कॉमेडी क्वीन भारती सिंग विविध कार्यक्रमातून आपल्याला हसवत आली आहे. स्टॅन्डअप कॉमेडी असो, स्किट, एखादा शो किंवा सूत्रसंचालन, भारती जेव्हा मंचावर उभी राहते तेव्हा प्रेक्षक हसणार यात तिळमात्र शंका राहत नाही. तिच्या उत्स्फूर्त शैलीमुळे ती सहज एखाद्याची टिंगल करत विनोद निर्मिती करते. भारती सिंग (bharati singh) आणि हर्ष लिंबाचिया (HARSH LIMBACHIYA) यांचा लग्न सोहळाही विशेष गाजला होता. सध्या ते दोघे 'हुनारबाझ' या शो मध्ये सूत्रसंचालन करत आहेत.

bharati singh
Shah Rukh Khan : ५६ व्या वर्षीही तब्येत अशी की पाहून डोळे फिरतील..

भारती आणि हर्ष २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकले. काही महिन्यापूर्वी त्यांनी भारती प्रेग्नन्ट असल्याची आनंदवार्ता दिली. त्यांनतर भारती वारंवार त्यासंदर्भात अपडेट देत होती. भारती आणि हर्ष हा काळ एन्जॉय करत असून विविध व्हीडीओ आणि फोटोच्या माध्यमातून ते चाहत्यांशी संवाद साधत असतात. काही महिन्यापूर्वी, 'तू चार मुलं जन्माला घालायला हवीत' अशी मागणी करणारा एक व्हिडीओ हर्ष ने तयार केला होता. त्या व्हिडीओत 'मुल जन्मला घालणे म्हणजे भाजीपाला नव्हे', असे उत्तर भारती हर्षला देते. शिवाय मातृत्वासोबतच करियरही महत्वाचे असल्याची जाणीव त्या दोघांनी चाहत्यांना करून दिली होती.

bharati singh
बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अजित पवारांच्या मुलाचा फोटो चर्चेत..

सध्या तिच्या प्रेग्नन्सीमधील शेवटचा महिना उरला आहे. त्यामुळे भारती आणि हर्ष समाज माध्यमांवर विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून याचा आनंद घेत आहेत. नुकतंच त्यांनी एक खास फोटो शूट करून घेतले आहे. या फोटोंचे कौतुक होत असून चाहत्यांना नव्या पाहुण्याची उत्सुकता आहे. हा फोटोशूट करताना भारती चाहत्यांना, प्रेग्नन्सीचा शेवटचा महिना सुरु असल्याचे सांगते. विशेष म्हणजे प्रेगन्सीच्या काळातही ती अगदी निष्ठेने आपले काम करताना दिसते आहे.

bharati singh
हेमांगी कवीला हॉट पुरुषांविषयी काय वाटतं?व्हिडिओ झाला व्हायरल..

भारतीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओला ती 'कभी भी आ सकता है...' असे कॅप्शन दिले आहे. भारती प्रेग्नन्सीच्या काळात अधिकच सुंदर दिसू लागली आहे अशा प्रतिक्रिया तिला चाहत्यांनी दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com