Mission Raaniganj Akshay Kumar Movie Entry in Oscar Award 2024 : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानं त्याच्या चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. मिशन रानीगंज हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. बॉक्स ऑफिसवर भलेही हा चित्रपट फारशी कमाई करु शकलेला नसला तरी त्यानं जाणकार प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षकांना प्रभावित केल्याचे दिसून आले आहे.
मिशन रानीगंज हा चित्रपट वास्तव घटनेवर आधारित आहे. १९८९ मध्ये पश्चिम बंगालमधील रानीगंजमध्ये घडलेल्या त्या घटनेनं खळबळ उडवून दिली होती. रानीगंजमधील कोळशाच्या खाणीत ६५ मजूर अडकून पडतात. त्यांना बाहेर कसे काढायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा मायनिंग इंजिनिअर जसवंत गिल हे काय करतात, हे मिशन रानीगंजमध्ये प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे.
Also Read - Financial Planning: कसे सुधारायचे आपले आर्थिक आरोग्य....
मिशन रानीगंजच्या निर्मात्यांनी आता या चित्रपटाबाबत एक मोठा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मेकर्सनं स्वतंत्ररीत्या हा चित्रपट ऑस्करला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे आता हा चित्रपट बेस्ट फॉरेन फिल्म अॅवॉर्ड कॅटगिरीमध्ये नामांकित होणार नसून त्याला दुसऱ्या कॅटगिरीतून आपले नॉमिनेशन सिद्ध करावे लागणार आहे. जसं की, गेल्या वर्षी हा प्रकार आरआरआरच्या बाबत घडला होता.
आता मिशन रानीगंज अन्य कोणत्या कॅटगिरीमध्ये आपले नामांकन सिद्ध करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यापूर्वी भारताकडून २०१८ एव्हरीवन इज ए हिरो या मल्याळम चित्रपटाला बेस्ट फॉरेन लँग्वेज या कॅटगिरीतून नामांकन म्हणून पाठवण्यात आले आहे. गेल्या वर्षी छेलो शो या गुजराती चित्रपटाला भारताकडून ऑस्करला पाठविण्यात आले होते.
मिशन रानीगंजनं किती कमाई केली?
एकीकडे शाहरुखचा जवान अजूनही बॉक्स ऑफिसवर टिकून असताना दुसरीकडे नव्यानं आलेल्या चित्रपटांमध्ये केवळ फुकरेची जादू दिसून आली आहे. आज सिनेमा डे असल्यानं केवळ ९९ रुपयांमध्ये प्रेक्षकांना चित्रपट पाहता येणार आहे. अक्षयच्या मिशन रानीगंजची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करताना दिसत नाहीये.
मिशन रानीगंजच्या कमाईत गेल्या दोन ते तीन दिवसांत किंचित वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सॅकनिक रिपोर्ट नुसार, सातव्या दिवशी या चित्रपटानं दीड कोटींची कमाई केली आहे. तर आठव्या दिवशी अडीच कोटींची कमाई करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आतापर्यत या चित्रपटानं केवळ २०.८ कोटींची कमाई केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.