mission raniganj Esakal
मनोरंजन

Mission Raniganj OTT Release: उत्तराखंडमधील 'त्या' थरारक घटनेचा अनुभव 'मिशन रानीगंज' मध्येही!

मिशन रानीगंज OTT रिलीज: Experience 'that' thrilling incident in Uttarakhand in 'Mission Raniganj' too!

Vaishali Patil

Mission Raniganj OTT Release: उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्याचा भाग कोसळून अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी दोन आठवड्यांनंतरही अथक संघर्ष सुरू आहे. सगळे देशवासी हे कामगार सुखरुप बाहेर पडावे यासाठी प्रार्थना करत आहेत. अशाच एका घटनेवर अभिनेता अक्षय कुमार याचा मिशन राणीगंज हा सिनेमा काही दिवसापुर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित होता. यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. 1989 मध्ये राणीगंजच्या कोळसा खाणीत अडकलेल्या कामगारांच्या बचावकार्याचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार जसवंत सिंग गिलची भूमिका साकारताना दिसला होता. जसवंत सिंग यांनी 65 मजुरांचे प्राण वाचवल्याबद्दल भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती रामास्वामी वेंकटरामन यांच्याकडून नागरी शौर्य पुरस्कार 'सोवंतम जीवन रक्षक पदक' देण्यात आले होते. 'मिशन राणीगंज' हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटातील कलाकरांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने केवळ 32 कोटींचा गल्ला जमवू शकला होता. आता ज्यांनी हा सिनेमा पाहिला नसेल त्यांच्यासाठी एक खास बातमी समोर आली आहे. 'मिशन राणीगंज' आता OTT वर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

'मिशन राणीगंज' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर येईल. 1 डिसेंबरपासून या चित्रपटाचा प्रीमियर होणार असल्याची चर्चा आहे. Netflixने ही माहिती पोस्ट आणि शेअर केली आहे.

'मिशन रानीगंज'मध्ये अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांच्या जोडी बरोबर दिव्येंदू भट्टाचार्य, रवी किशन, राजेश शर्मा, कुमुद मिश्रा, वरुण बडोला हे कलाकार आहेत. 'मिशन राणीगंज'चे दिग्दर्शन टिनू सुरेश देसाई यांनी केले आहे.

अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये दिसणार त्याचबरोबर 'हेरा फेरी 3', 'वेलकम टू द जंगल', 'हाऊसफुल 5' आणि 'जॉली एलएलबी 3' या चित्रपटात काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Asia Cup 2025: भारताच्या ७ खेळाडूंचे आशिया चषक संघात पदार्पण; त्यापैकी पाच प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की दिसणार

Latest Marathi News Updates : नळदुर्ग रोडवर चालत्या एसटी बसने घेतला पेट

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

SCROLL FOR NEXT