Harnaaz Sandhu Google
मनोरंजन

ऑलम्पिक स्पर्धा मानाच्या मग सौंदर्यस्पर्धा का दुय्यम?हरनाज संधू भडकली

तिच्यामुळे तब्बल २१ वर्षांनंतर २०२१ मध्ये भारतानं मिस.युनिव्हर्स स्पर्धेचा किताब पटकावला

प्रणाली मोरे

तब्बल 21 वर्षांनी भारतानं 'मिस.युनिव्हर्स' स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आणि हरनाज संधू(Harnaaz Sandhu) हे नाव भाराताच्याच नाही तर जगाच्या कानाकोप-यात काही सेकंदातच पोहोचलं. 2000 साली लारा दत्तनं हे विजेतेपद पटकावलं होतं पण त्यानंतर मात्र कोणीच ही कमाल दाखवी शकलं नव्हतं. आता भारतात सौंदर्यवतींची कमतरता आहे तर तसंंही नाही, उलट सौंदर्यासोबतच तल्लख बुद्धिमत्ता असं बेस्ट कॉम्बिनेशन असलेल्या अनेक स्त्रिया भारतात आहेत पण तरीही 'मिस.युनिव्हर्स' स्पर्धा जिंकायला भारताला एवढे वर्ष वाट पहावी लागली. आता एवढं मोठं यश मिळवूनही हरनाज संधूला मात्र असं काही ऐकावं लागलंय की तिचा रागाचा पारा अचानक चढला आहे. असं काय कुणी बोललंय तिला हे जाणून घेऊया.

तर त्याचं झालं असं की एका मुलाखतीत ती म्हणाली,''मला दुःख होतंय की आजही लोकांना सौंदर्यस्पर्धा म्हणजे फक्त सुंदर दिसलं की झालं असंच वाटतं. तर असं नाही आहे. सुंदर दिसण्यासोबतच बुद्धिचातुर्यही तितकंच महत्त्वाचं आहे. अफाट वाचन करुन माहिती जेवढी संपादित करून घेऊ तेवढी कमी. आणि केवळ पुस्तकी किड्याला तर इथे थाराच नाही. तुम्ही चाणाक्ष असायला हवं. आणि इतकं सगळं असताना आजही लोक सौंदर्यस्पर्धांना दुय्यम स्थान देतात. मला ही ऐकावं लागलं की सुंदर दिसते,सुंदर चेहरा आहे म्हणून जिंकली. पण असं म्हणणा-यांना मला पुन्हा सांगावसं वाटतं की सौंदर्यस्पर्धा जिंकणं म्हणजे ऑलिम्पिक पदक जिंकण्यासारखंच आहे. तुम्ही एखाद्या खेळाडूला जितका मान देता तेवढा आम्हाला का नाही देत असा प्रश्न तिनं केला आहे.

हरनाज संधू पुढे म्हणाली,''मी माझ्या कामातनं हे दाखवून देणार की सौंदर्य हे फसवं नसतं. मला मी करणा-या सिनेमांमध्ये अशा भूमिका करायच्या आहेत ज्या नुसत्या मेकअप करून मिरवणा-या नसतील. तर प्रत्येक भूमिकेत एक आव्हान असेल. हरनाज संधू 'मिस.युनिव्हर्स' व्हायच्या आधीपासनं पंजाबी सिनेमांतून काम करीत आहे. तिने कपिल शर्मा शो ची स्टार उपासना सिंगची निर्मिती असलेले दोन प्रोजेक्ट्सही साइन केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपुरात कचरा गाडी चालकाचा खून, जुना वादातून घडली घटना...

Pune Heavy Rain: पुणेकर हैराण; पावसाने रस्ते जलमय, कामावर जाणाऱ्यांना मनस्ताप, विद्यार्थ्यांचीही झाली अडचण

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Gram Panchayat Employee: 'साताऱ्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा ठिय्या'; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात दिवसांपासून आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

मोठी बातमी! वीज ग्राहकांनो, ‘टीओडी’ मीटर बसविल्यास सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ८० पैसे ते १ रुपयांची सवलत; सोलापुरातील २.१८ लाख ग्राहकांकडे नवे मीटर

SCROLL FOR NEXT