Mithun Chakraborty 
मनोरंजन

Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक? कोलकाता येथील अपोलो रुग्णालयात उपचारांसाठी दाखल- रिपोर्ट

Mithun Chakraborty: मिथुन यांना कोलकाता येथील रुग्णालयात भरती करण्यात आलं.

सकाळ डिजिटल टीम

Mithun Chakraborty: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, मिथुन यांना ब्रेनस्ट्रोक झाल्यानं त्यांना कोलकाता येथील अपोलो रुग्णालय दाखल करण्यात आलं, असं म्हटलं जात आहे.

आज (10 फेब्रुवारी) सकाळी अचानक मिथुन चक्रवर्ती यांच्या छातीत दुखू लागले. अशातच त्यांना अस्वस्थताही जाणवत होती. त्यामुळे मिथुन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजून मिथुन यांच्या हेल्थबाबत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही.

मिथुन हे विविध कार्यक्रम तसेच चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सारेगमप या कार्यक्रमामध्ये चीफ गेस्ट म्हणून मिथुन यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी मिथुन यांचा मुलगा नमाशीनं मिथुन यांच्यासाठी खास मेसेज पाठवला होता तो मेसेज पाहिल्यानंतर मिथुन भावूक झाले. मिथुन चक्रवर्ती हे 73 वर्षांचे आहेत. तरी देखील मिथुन हे त्यांच्या डान्स आणि हटके स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकतात.

मिथुन यांचे चित्रपट

2022 मध्ये रिलीज झालेल्या विवेक अग्निहोत्रींच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात मिथुन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.'परिवार', 'मेरा यार मेरा दुश्मन', 'बात बन जाए' आणि 'दीवाना तेरे नाम' यांसारख्या जवळपास 350 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मिथुन यांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT