mithun da 
मनोरंजन

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी दिले मिथुन चक्रवर्तींचे हेल्थ अपडेट, शूटींगदरम्यान झाले होते बेशुद्ध

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत शनिवारी अचानक बिघडली. मिथून दा मसुरीमध्ये शूटींग करत होते. शूटींगदरम्यानंच ते सेटवर बेशुद्ध झाले. मिथुन दा यांच्या तब्येतीची माहिती मिळताच डॉक्टरांची एक टीम हॉटेलमध्ये पोहोचली आणि त्यांची तपासणी केली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या तब्येतीत आता पहिल्यापेक्षा चांगली सुधारणा आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यादिवशी पुढे शूटींग करणार नव्हते मात्र मिथुन दा यांनी त्यांना शेवटचा सीन संपवण्याची त्यांना विनंती केली होती. 

एका वेबसाईटशी बोलताना अग्निहोत्री यांनी सांगितलं की, ''हा एक एक्शन सीन होता जो भव्य प्रकारे शूट केला जाणार होता. या सीनमध्ये मिथुन सर यांची भूमिका महत्वाची होती. फुड पॉयजनिंगमुळे त्यांची तब्येत बिघडली. इतकंच नाही तर ते उभे देखील राहु शकत नव्हते. एका मोठ्या ब्रेकनंतर आम्ही तो सीन शूट करुन संपवला.

अग्निहोत्री पुढे सांगतात की, हे एक अभिनेता म्हणून कामाप्रती असलेल्या समर्पणाचं उत्तम उदाहरण आहे.''अग्निहोत्री पुढे सांगतात, ''त्यांनी मला सांगितलं की चार दशकांच्या त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये ते कधीच अशा प्रकारे सेटवर शूटींग दरम्यान आजारी पडले नव्हते. ते हाच विचार करत होते की यामुळे शूटींग थांबलं नाही पाहिजे. त्यादिवशी सेटवर सीन संपल्यानंतर पॅकअप केलं गेलं. जेव्हा रविवारी सकाळी ते सेटवर पोहोचले तेव्हा त्यांनी सांगितलं की जे काही काम उरलं असेल ते पूर्ण केलं जावं. '' 

याआधी देखील मिथून चक्रवर्ती यांनी डेहराडूनमध्ये या प्रोजेक्टची शूटींग केली होती. सेटवरचा त्यांचा एक फोटो समोर आला होता ज्यामध्ये त्यांचे लांब सफेद केस आणि वाढलेली दाढी असा लूक दिसला होता. डेहराडूनशिवाय ऋषिकेशमध्ये देखील काही शूटींग पार पडलं होतं.   

mithun chakraborty health updated after collapses on set in mussoorie  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

पोयरी हलु हलु नाच… ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर viral video

SCROLL FOR NEXT