mithoon mahaakshay
mithoon mahaakshay 
मनोरंजन

मिथुन चक्रवर्तींचा मुलगा आणि पत्नी विरोधात एफआयआर दाखल, बलात्कार आणि जबरदस्ती गर्भपाताचा आरोप

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती अडचणीत सापडला आहे. त्याच्या विरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार आणि गर्भपात करायला लावल्याची केस दाखल केली गेली आह. या प्रकरणात मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी योगिता बाली यांच्यावरही आरोप केले गेले आहेत. हे आरोप सिने इंडस्ट्रीमध्ये काम करणा-या एका अभिनेत्री-मॉडेलने लावले आहेत. 

मिडिया रिपोर्ट्सनुसार, पिडीत अभिनेत्रीने एफआयआरमध्ये सांगितलंय की 'ती आणि महाअक्षय २०१५ मध्ये रिलेशनशिपमध्ये होते. २०१५ मध्ये महाक्षयने पिडित अभिनेत्रीला घरी बोलवलं आणि तिच्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये नशेचं औषध मिसळलं. या दरम्यान महाक्षयने पिडित अभिनेत्रीच्या सहमतीशिवाय तिच्यासोबत शारिरिक संबंध ठेवले आणि नंतर कित्येकदा लग्न करण्याच्या गोष्टी केल्या. महाक्षयने लग्नाचं वचन देऊन कित्येकदा तिच्यासोबत शारिरिक संबंध ठेवले.'

महाक्षयवर असा आरोप आहे की त्यानंतर जवळपास चार वर्ष तो पिडित अभिनेत्रीसोबत शारिरिक संबंध ठेवत होता. सोबतंच तिचा मानसिक छळ देखील केला. एफआयआरनुसार, 'जेव्हा पिडित अभिनेत्री गरोदर राहिली तेव्हा महाक्षयने तिला जबरदस्ती गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. जेव्हा तिने गर्भपात करण्यास नकार दिला तेव्हा तिला गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला.

पिडित अभिनेत्रीचं म्हणणं आहे की तिला दिल्या जाणा-या गोळ्या या गर्भपाताच्या आहेत हे तिला माहित नव्हतं. या पिडित अभिनेत्रीने महाक्षयची आई आणि मिथुन चक्रवर्तीची पत्नी योगिता बालीवर तक्रार केल्यानंतर धमकवल्याचा आणि प्रकरण दाबुन टाकण्यासाठी दबाव टाकल्याचा देखील आरोप आहे.

महाक्षय आणि योगिता बाली विरोधात ३७६(२) (एन) (एकाच महिलेवर सतत बलात्कार करणं), ३२८ ( विष किंवा इतर कोणत्याही माध्यमातून तिचं नुकसान करणं) ४१७ (धोका), ५०६(धमकावणं), ३१३ (महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात) आणि कलम ३४ अंतर्गत केस दाखल केली आहे.   

mithun chakraborty son mahaakshay and his wife yogeeta bali have been accused of rape fir filed 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT