mithun chakraborty struggled for one time meal had to dance at parties
mithun chakraborty struggled for one time meal had to dance at parties sakal
मनोरंजन

लोकांच्या पार्टीत नाचून पोट भरायचे मिथुनदा, कसा होता त्यांचा स्ट्रगल..

नीलेश अडसूळ

Mithun Chakraborty Birthday : बॉलिवूड चित्रपटसृष्टीत 'डिस्को डान्सर' म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांचा आज (16 जून) वाढदिवस. आज जरी मिथुनदा बॉलीवूडचे बादशाह असले तरी एकेकाळी त्यांनी फार हाल अपेष्टा सहन केल्या आहेत. डिस्को डान्सर म्हणून ख्याती होण्यामागे खूप मेहनत आहेत. आपला विश्वास बसणार नाही पण केवळ दोन वेळचं जेवण मिळावं यासाठी मिथुन दा लोकांच्या पार्टी नाचायचे. आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त जाणून घेऊया त्यांचा स्ट्रगल. (mithun chakraborty struggled for one time meal had to dance at parties)

मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म 16 जून 1950 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे मूळ नाव गौरांग चक्रवर्ती आहे. मिथुन चक्रवर्ती चित्रपट जगतात पाऊल ठेवण्यापूर्वी अभिनेत्री हेलन यांचे सहाय्यक होते. मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 साली 'मृगया' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्यावेळी अभिनय, अॅक्शन आणि नृत्य या तिन्हीमध्ये मुशाफिरी करणारे मिथुनदा हे महत्वाचे अभिनेते मानले जायचे. त्यांनी बंगाली, हिंदी, ओरिया, भोजपुरी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजाबी अशा विविध भाषांमध्ये 350हून अधिक चित्रपट केले आहेत. पण मिथुन यांचा सुरवातीचा काळ अत्यंत खडतर होता.

एका मुलाखतीत मिथुनदा म्हणाले होते, 'एक वेळचे जेवण मिळावे म्हणून मी स्ट्रगलच्या काळात मोठ्या पार्ट्यांमध्ये डान्स करायचो. मुंबईत आलो तेव्हा माझ्याकडे राहायला जागा नव्हती. वॉचमनची नजर चुकवून आम्ही इमारतीच्या छतावर टाकीच्या मागे लपून झोपायचो. खिशात पैसे नसायचे म्हणून पायी प्रवास करायचो. कोणीतरी आपल्याला हिरो म्हणून कास्ट करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं.' पुढे मिथुन यांना चित्रपटात काम मिळाले. त्यांनी संधीचं सोनं केलं आणि डान्सर पासून 'हिरो' पर्यंत पोहोचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

SCROLL FOR NEXT