MNS Chief Raj Thackeray on Nitin Desai suicide in Karjat demands investigation  
मनोरंजन

Nitin Desai News : "...ही वेळ कशामुळे आली याचा छडा लागला पाहिजे"; नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंची मागणी

रोहित कणसे

Raj Thackeray Latest News : प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथील एन.डी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. देसाई यांच्या आत्महत्येचं वृत्त समजताच कलाक्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्रतून देखील हळहळ व्यक्त होत आहे. अनेक दिग्गज अभिनेते राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट लिहीत नितीन देसाई यांच्या आत्महत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं असून नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल? तसेच त्यांनी त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल याचा छडा लागला पाहिजे असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे काय म्हणालेत?

"ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो, त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासं आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो, हे अनाकलनीय आहे." असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांनी नितीन देसाईंच्या आत्महत्येमागील कारण समोर आलं पाहिजे अशी मागणी देखील केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, "नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल ? त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे."

असो, कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा. नितीन देसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली, अशा शब्दात राज ठाकरे यांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT