Mohan Joshi 
मनोरंजन

लशीच्या दोन डोसनंतरही अभिनेते मोहन जोशी यांना कोरोना

'अग्गंबाई सूनबाई'च्या शूटिंगनिमित्त गेले होते गोव्याला

स्वाती वेमूल

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी Mohan Joshi यांना कोरोनाची लागण झाली असून सोशल मीडियाद्वारे त्यांनी याबद्दलची माहिती दिली. रविवारी संध्याकाळी त्यांनी ही पोस्ट लिहिली होती. मोहन जोशी यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतले होते. 'अग्गंबाई सूनबाई' Aggabai Sunbai या मालिकेत ते भूमिका साकारत आहेत. या मालिकेच्या शूटिंगनिमित्त ते गोव्याला गेले होते. गोव्यात शूटिंगला परवानगी नाकारल्यानंतर मालिकेची संपूर्ण टीम मुंबईला परतली. मोहन जोशींवर सध्या उपचार सुरू असून त्यांनी चाहत्यांनाही काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. (Mohan Joshi tests positive for COVID 19)

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत ते आसावरीच्या सासऱ्यांची भूमिका साकारत आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउन घोषित झाल्यानंतर या मालिकेचं शूटिंग गोव्यात केलं जात होतं. मात्र गोव्यातही कोरोनारुग्णांची वाढती संख्या पाहता तिथे मालिका, चित्रपटांच्या शूटिंगवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर ही टीम मुंबईला परतली आणि मुंबईला परतल्यानंतर मोहन जोशी यांना कोरोनाची लागण झाली.

हेही वाचा : "फक्त सरकारला दोष देऊन उपयोग नाही तर.. "; 'जेठालाल'ची विनंती

गेल्या वर्षी मालिकेत आसावरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाली होती. तर 'पाहिले न मी तुला' या मालिकेतील आशय कुलकर्णीलाही कोरोनाची लागण झाल्याने तो गोव्याला शूटिंगसाठी जाऊ शकला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT