Swara Bhasker Video Esakal
मनोरंजन

Swara Bhasker Video: स्वरा जरा जपून, गरोदरपणात असं नाचणं बरं नाही! नेटकऱ्यांचा सल्ला

Vaishali Patil

Mom-to-be Swara Bhasker Flaunts Baby Bump: अभिनेत्री स्वरा भास्करही नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. स्वरा कोणत्याही मुद्द्यावर बिनधास्त मत मांडते. ती अनेकदा राजकारणी किंवा कलाकार यांच्यावर टिका करतांना दिसते. त्यामुळे स्वराला ट्रोलही केलं जात.

स्वराने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदशी लग्नगाठ बांधली आहे. ती बऱ्याचदा तिच्या पतीसोबतचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. लग्नाच्या 3 महिन्यांनंतरच स्वराने चाहत्यांना गोड बातमी देत तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. यावेळी स्वरानं काही फोटो शेयर केली होती.

आता पुन्हा स्वरा चर्चेत आली आहे. स्वराने तिचा बेबी बंप दाखवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक स्पष्ट दिसत आहे. स्वरा भास्कर या व्हिडिओमध्ये मेकअपशिवाय दिसत आहे. तिचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

तिने काळ्या आणि निळ्या रंगाचा कफ्तान परिधान केलेला दिसत आहे. या दरम्यान, अभिनेत्री तिच्या बेबी बंप शो करत गोल गोल फिरत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये स्वरानं लिहिलं की, आजकाल मॅटर्निटी वेअरचा वर्षाव होत आहे. नवीन आणि अतिशय आरामदायक वॉर्डरोबसाठी धन्यवाद..

तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केली आहे. काहीनीं तिचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरेज केले होते. स्वरानं त्याचा व्हिडिओ शेयर करत ही बातमी दिली होती. त्यानंतर त्यांनी मार्चमध्ये लग्नगाठ बांधली. दिल्लीत लग्नानंतर या जोडप्याने बरेलीमध्येही ग्रँड रिसेप्शन दिले.

फहाद अहमद हे समाजवादी पक्षाच्या युवा शाखेचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. स्वरा भास्कर आणि फहाद अहमद लग्नाआधी एकमेकांना डेट करत होते. स्वरा भास्कर लग्नानंतर खूप ट्रोल झाली होती. लग्नानंतर स्वरा भास्करचा 'मिसेस फलानी' हा पहिलाच चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : ''मराठीसाठी हिंसाचार करणार, काय उखडायचं ते उखडा''; संजय राऊतांचे फडणवीसांना ओपन चॅलेंज, वेगळ्या विदर्भाबाबतही केला मोठा दावा...

Pune News : पुण्यात फिरते खंडपीठ स्थापन होण्याची शक्यता; सरन्यायाधीश आणि मुख्य न्यायाधीशांचा सकारात्मक प्रतिसाद

Satej Patil : 'तुम्ही जे पेराल तेच उगवणार' धनंजय महाडिक यांची नाव न घेता सतेज पाटील यांच्यावर टीका

Latest Marathi News Updates Live : सोलापूर साखर घोटाळ्यावर राजकीय खळबळ; माजी आमदार राऊत यांची ईडीकडे तक्रार

मुलांची भूक वाढवण्यासाठी काय करावे? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT