मनोरंजन

Teaser: आतुरता संपली; 'मनी हाईस्ट'च्या पाचव्या सीझनची तारीख जाहीर

विनायक होगाडे

'ला कासा दे पापेल' (La Casa De Papel) या स्पॅनिश वेब सीरिजची इंग्रजी आवृत्ती 'मनी हाईस्ट' (Money Heist) प्रचंड लोकप्रिय आहे. जगभरात लोकप्रियता मिळवलेल्या या सीरिजचा पाचवा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मने दिली आहे. जगभरातील 'मनी हाईस्ट'चे चाहते त्याच्या पाचव्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा पाचवा भाग या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना महामारीच्या संकटामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

नेटफ्लिक्सने आज सोमवारी 'मनी हेईस्ट' या लोकप्रिय वेबसिरिजच्या पुढील सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. मनी हेईस्टचा हा पाचवा सीझन दोन पार्ट्समध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती नेटफ्लिक्सने दिली आहे. त्यानुसार, पहिला पार्ट 3 सप्टेंबर 2021 रोजी तर दुसरा पार्ट 3 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 'मनी हाईस्ट'चा चौथा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये पाचव्या सिझनची तयारी सुरू झाली होती. मात्र प्रॉडक्शनचं काम रखडल्यामुळे आणि कोरोनाच्या संकटामुळे प्रदर्शन पुढे ढकलण्यात येत आहे.

काय आहे मनी हाईस्ट?

स्वत:कडे गमावण्यासारखं काहीच नसलेल्या आठ जणांना एकत्र आणून 'प्रोफेसर' हा चोरीचा मोठा कट रचतो. सध्या जगभरात लोकप्रियता मिळवलेली ही सीरिज एकेकाळी सुपरफ्लॉप ठरली होती. मात्र 'नेटफ्लिक्स'ने या सीरिजला दत्तक घेतल्यानंतर आणि त्याचे विविध भाषेत रुपांतर केल्यानंतर त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT