मुंबई - मनी हाईस्ट ही बेवसीरीज पाहिली नाही असा व्यक्ती सापडणे दुर्मिळ असे म्हणावे लागेल. काहींना हे बोलणे अतिशोयक्तिचे वाटत असले तरी लॉकडाऊनच्या काळात या वेबसीरिजचा प्रेक्षकवर्ग वाढल्याची माहिती समोर आली होती. मोठ्या संख्येने त्याचा टीआरपी वाढला होता. अशा या जबरदस्त लोकप्रिय मालिकेचा शेवटचा 5 वा भाग आता प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या वेबसीरिजे चाहते शेवटच्या सिझनची आतूरतेनं वाट पाहत होते.
अभिनेता अल्वारो मोर्ते याने मनी हाईस्टमध्ये ‘प्रोफेसर’ची भूमिका साकारली आहे. या मालिकेतील सर्वाधिक लोकप्रिय भूमिका म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या पाचव्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजचा पाचवा भाग हा येत्या पाच मे २०२१ पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘मी परत आलोय. प्रोफेसर परत आलाय’, असं कॅप्शन देत अल्वारोने एक फोटो पोस्ट केला आहे.
‘मनी हाइस्ट’चा चौथा सिझन एका धक्कादायक प्रसंगावर थांबला होता. यापुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. स्वत:कडे गमावण्यासारखं काहीच नसलेला एक प्रोफेसर विविध क्षेत्रातील आठ लोकांना एकत्र आणून चोरीचा मोठा प्लॅन आखतो. या लक्षवेधी चोरीने तब्बल चार सिझन प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. आता या सीरिजचा पाचवा आणि शेवटचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
नेटफ्लिक्सवर असणा-या या मालिकेचा लॉकडाउनच्या काळात हा चौथा सिझन प्रदर्शित झाला. त्यानंतर ती बराच काळ टॉप ट्रेण्डिंग सीरिजमध्ये मध्ये होती. ज्याच्या त्याच्या बोलण्यात या मालिकेचे नाव होते. इतके गारुड या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर केले आहे. आता तर बॉलीवूडचा किंग खान हिंदीत या मालिकेची निर्मिती करणार असल्याची चर्चा आहे. भारतातही या सीरिजचे खूप चाहते आहे. प्रोफेसरची भूमिका साकारणारा अभिनेता अल्वारो मोर्तेची युथमध्ये मोठी क्रेझ आहे. मूळ स्पॅनिश भाषेत असलेल्या या सीरिजने आपल्या दमदार पटकथेच्या ताकदीवर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.