chunari song 
मनोरंजन

व्हिडीओ: ‘मनी हाइस्ट’मधल्या ‘इन्स्पेक्टर रकेल’ने गायलं सलमानचं ‘चुनरी चुनरी’ गाणं

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- ‘मनी हाइस्ट’ ही वेब सीरिज अनेकांच्या पसंतीस पडत आहे. मूळ स्पॅनिश भाषेत असलेल्या या सीरिजने पटकथेच्या जोरावर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय. या सीरिजमधील कलाकारांचं बॉलिवूड कनेक्शन अनेकदा पाहायला मिळालं. आता त्यात इन्स्पेक्टर रकेलची भूमिका साकारणारी अभिनेत्री इतझियार इत्योनोचा बॉलिवूड गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

‘शोशा’ या कार्यक्रमात इतझियारने बॉलिवूड डान्स प्रचंड आवडत असल्याचं सांगितलं. त्याचसोबत तिने सलमान खान आणि सुश्मिता सेन यांच्यावर शूट झालेलं ‘चुनरी चुनरी’ हे गाणंसुद्धा गायलं. इतकंच काय तर बॉलिवूडमधल्या सिनेमात काम करायची इच्छा देखील तिने व्यक्त केलीये. नुकतंच सुश्मिता सेनने हा व्हिडिओ पोस्ट करत त्याला 'ये बात' असं कॅप्शन देखील दिलंय. या सीरिजमधल्या कलाकार हे त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे आज जगभरामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. 

या व्यक्तीरेखांपैकी एक म्हणजे नैरोबी. सर्वांची काळजी घेणारी, सर्वांना समजून घेणारी नैरोबी पडद्यावर साकारणारी अल्बा फ्लोरेसचे खूप चाहते आहेत. ‘व्हाइसेंटे फेरेर’ या स्पॅनिश सिनेमामध्ये अल्बाने आंध्रप्रदेशमधील एका ग्रामीण भागातील महिलेची भूमिका साकारली होती. या सिनेमामध्ये अल्बाने साकारलेल्या भूमिकेचे नाव शामिरा असं होतं. यामध्ये अल्बा अगदी एखाद्या दाक्षिणात्य कलाकाराप्रमाणे डायलॉगबाजी करताना दिसतेय.

‘मनी हाइस्ट’ ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ही सगळ्यात हिट ठरलेल्या वेब सीरिजपैकी एक आहे. स्वत:कडे गमावण्यासारखं काहीच नसलेल्या आठ जणांना एकत्र आणून ‘प्रोफेसर’ चोरीचा मोठा प्लान आखतो. मूळ स्पॅनिश भाषेत असलेल्या या सीरिजचं भाषांतर करून ती नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आली. नुकतीच या सीरिजच्या पाचव्या सिझनची घोषणा देखील करण्यात आली आहे. तेव्हा चाहते या आगामी सिझनची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. 

money heists lisbon sings salman khans chunari chunari song  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

Nagpur Police Endlife: नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची साडीने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिस दलात खळबळ, कारणांचा तपास सुरू

Marathi News Live Updates : दिल्लीत २५ 'अटल कॅन्टीन्स'चे उद्घाटन; ५ रुपयांत मिळणार जेवण

Golden Pyramid of Fat Loss: फॅट लॉससाठी तज्ज्ञ का फॉलो करायला सांगतात ‘गोल्डन पिरॅमिड’ फॉर्म्युला? वजन कमी करण्याचा योग्य क्रम जाणून घ्या!

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

SCROLL FOR NEXT