Who Is Muskan Jattana esakal
मनोरंजन

Who Is Muskan Jattana: उर्फीला चँलेज करणारी 'मूस जट्टाना' आहे कोण? तिनं चक्क...

सोशल मीडिया इन्फ्लुंसर मुस जट्टाना ही आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिनं थेट उर्फीलाच आव्हान दिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Moose Jattana social media viral news urfi javed fashion : सोशल मीडिया इन्फ्लुंसर मुस जट्टाना ही आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिनं थेट उर्फीलाच आव्हान दिले आहे. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले आहे. यापूर्वी देखील आपल्या बोल्डनेसनं मुसनं मोठी खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे पुन्हा एकदा वेगळ्या चर्चेला सुरुवात होणार आहे.

मुस ही ऑस्ट्रेलियन दक्षिण आशियाई केंद्राची ब्रँड अॅम्बेसिडर आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच अॅक्टिव्ह असते. याशिवाय ती तरुणांमध्ये विशेषत महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे. लैंगिक समानतेवर आधारित यापूर्वी मुसनं खूप साऱ्या पोस्ट केल्या आहेत. मी तर मुलींना देखील डेट करु शकते. असं खळबळजनक वक्तव्य तिनं एकदा केले होते.

Also Read - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

आता मुस ही एमटीव्ही स्प्लिट्सविलामध्ये सहभागी होणार आहे. याविषयी बोलताना तिनं वेगवेगळ्या गोष्टींविषयी भाष्य केले आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं तिचा जोर हा उर्फीवर होता. मला जर सहन झाले नाही तर मग मी ती काय आहे हे सगळ्यांना सांगितल्याशिवाय राहणार नाही. मुसला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्या ही तीन लाखांपेक्षा जास्त आहे. ती कायम तिच्या वादग्रस्त पोस्टसाठी ओळखली जाते.

एका मुलाखतीमध्ये मुस ही उर्फीच्या फॅशन सेन्सवर जोरजोरानं हसली होती. ती करते त्याला तुम्ही फॅशन कसे काय म्हणू शकता असा प्रश्न मुसनं केला होता. तेव्हापासून उर्फी आणि मुसमध्ये छत्तीसचा आकडा आहे. त्यांच्यातील भांडणं मात्र नेटकऱ्यांसाठी मनोरंजनाचा विषय ठरताना दिसून आले आहे.

उर्फी काहीतरी करण्याच्या नादात फसते आणि मग ट्रोल होते. तिला आपण काय करतो हे कळत नाही. तिला कुणी सांगितले तर रागही येतो. त्यामुळे आपण ते ध्यानं फक्त पाहत बसायचे. एवढचं सांगावं लागेल. दुसरीकडे ती महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करताना दिसते. त्याला किती महत्व द्यावे त्यावरुन किती बोलावं याचे तिला भान नाही. असेही मुसनं म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT