Fashion Designer Suicide
Fashion Designer Suicide Esakal
मनोरंजन

Moradabad Suicide: आणखी एका आत्महत्येने हादरली इंडस्ट्री! फॅशन डिझायनरचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Fashion Designer Suicide: काही दिवसांपुर्वी आकांक्षा दुबे या अभिनेत्रीने आत्महत्या करत आपले जीवन संपवले. तिच्या आत्महत्येचा तपास सुरुच असतांना आता उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका फॅशन डिझायनरचा मृतदेह तिच्याच बेडरूममधून संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे.

ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. ठाणे सिव्हिल लाईन्स परिसरातील रामगंगा विहार कॉलनीत राहणारी २५ वर्षीय फॅशन डिझायनर मुस्कान नारंग हिचा मृतदेह पंख्यांला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. होळीच्या दिवशी ती मुंबईहून घरी गेली होती, त्यानंतर परत गेलीच नाही, असंही वडीलांनी सांगितलं आहे.

या घटनेबद्दल माहिती देतांना मुस्कानचे वडील चंद्र प्रकाश नारंग यांनी सांगितले की, मुस्कान मुंबईहून घरी परतल्यापासून खूपच अस्वस्थ होती. रात्री आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केले, त्यानंतर ती खोलीत झोपायला गेली.

शुक्रवारी सकाळी मुस्कानच्या खोलीचा दरवाजा बराच वेळ न उघडल्यानं घरातील लोक बराच वेळ बाहेरून मुस्कानला फोन करत होते मात्र तिने काहीच उत्तर दिले नाही. कोणतेही उत्तर न मिळाल्याने भीतीने खिडकीतून आत डोकावले असता त्यांना मुस्कानचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

मुस्कानच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आहे. या प्रकरणी कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रप्रकाश नारंग हे व्यावसायिक असून, डिस्पोजेबल क्रॉकरी व्यवसायातील एक मोठे व्यावसायिक आहेत. नारंग यांना ३ मुली आणि एक मुलगा आहे. मुस्कान सर्वात मोठी मुलगी होती, तिने दिल्लीत फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आणि त्यानंतर ती मुंबईतील एका कंपनीत फॅशन डिझायनर म्हणून काम करू लागली.

मुस्कान नारंगने तिच्या आत्महत्येच्या एक दिवस आधी तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओच्या सुरुवातीला मुस्कान म्हणाली की, "म्हणून आजचा हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल. त्यानंतर तुम्ही मला पाहू शकणार नाही. लोक म्हणतात तुमच्या आयुष्यातल्या समस्या शेअर करा, शेअर केल्याने सर्व काही ठीक होते, पण असे काही नाही झालं. "

व्हिडिओमध्ये मुस्कान पुढे म्हणाली आहे की, 'मी खूप प्रयत्न केले. सर्वांना समजावण्याचा प्रयत्न केला. बहिणी, आई-वडील, मैत्रिणी पण सगळे मला उलट समजावतात. आज मी हे करत आहे. मी माझ्या इच्छेनुसार सर्वकाही करत आहे. यात इतर कोणाचाही सहभाग नाही. त्यामुळे मी गेल्यावर कृपया इतर कोणाला दोष देऊ नका. लोक म्हणतात की तुमच्यात आत्मविश्वास नाही. असे सांगितल्यानंतर मुस्कानने संपूर्ण प्रकरण उलटं फिरवलं आणि मजेदार मूडमध्ये तिने हा व्हिडिओ संपवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT