Mouni Roy Was In Hospital For 9 Days Esakal
मनोरंजन

Mouni Roy: मौनीला सतावतेय कसली चिंता? 9 दिवसांनंतर हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज

Vaishali Patil

Mouni Roy Was In Hospital: टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींचे गणली जाणारी अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय. टिव्हीविश्व ते बॉलिवूड मौनीने अभिनयच्या आणि मेहनतीच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख तयार केली आहे. मात्र आज मौनीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.

ज्यामुळे तिच्या चाहत्यांना तिची चिंता लागली आहे. मौनी रॉयला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या तब्बल नऊ दिवस उपचार सुरु होते. तिने तिच्या कामातून ब्रेक घेतला आहे आणि ती दुबईमध्ये तिच्या पतीसोबत वेळ घालवत आहे.

मौनी रॉयने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेयर केले आहेत. तिला आता बरं वाटत आहे. ती गेल्या 9 दिवसांपासून रुग्णालयात होती. तिच्यावर उपचार सुरु होते.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “9 दिवस हॉस्पिटलमध्ये घालवल्यानंतर, मला कधीही अनुभवलेली शांतता वाटते. मी आता घरी आली आल्याने हे सांगतांना मला खुप आनंद होत आहे आणि मी हळूहळू बरे होत आहे."

पुढे अभिनेत्री म्हणाली, "माझ्या प्रिय मित्रांचे खूप खूप आभार ज्यांनी माझी काळजी घेतली आणि मला शुभेच्छा आणि प्रेम दिलं" यात तिने तिचा पती सूरज नांबियार याच्यासाठी देखील लिहिलं आहे ती म्हणते की, "तुझ्यासारखा कोणी नाही.. मी कायमची ऋणी आहे."

काही तासांपूर्वी मौनीने आणखी एक पोस्ट केली होती, या पोस्टमध्ये काही फसव्या गोष्टींकडे बोट दाखवलं होतं. अशा परिस्थितीत मौनीला अतिविचारामुळे आणि ताणतणावामुळे रुग्णालयात जावं लागलं असल्यांचीही चर्चा सुरु आहे.

मौनीची ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. नेटकरी तिच्या तब्येतीची चिंता करत आहेत.तर काहींनी तिला काळजी घेण्याचं आवाहन घेतलं आहे.

मौनीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती गेल्या वर्षी हसीना अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसली होती. ती लवकरच 'फ्लिक द वर्जिन ट्री' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात मौनीशिवाय संजय दत्त, पलक तिवारी आणि सनी सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार म्हणजे 'देशी ब्रिटिश', असिम सरोदेंच्या निलंबनावरून ठाकरे गट आक्रमक....

Ahilyanagar fraud: नफ्याच्‍या आमिषाने तीन कोटींची फसवणूक; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नडली, अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

लग्नाच्या आमिषाने संबंध, गुण जुळेनात म्हणत नकार दिल्याचा आरोप; सुप्रीम कोर्ट म्हणाले, कुंडली बघून नातं जोडलं पाहिजे

Latest Marathi News Live Update : हवेतील गारठा वाढला, राज्यात थंडीला सुरुवात,

UPI Digital Payment : UPI ची वर्ल्डवाइड झेप! मोडले सर्व रेकॉर्ड; एका महिन्यात २७ लाख कोटींचे व्यवहार

SCROLL FOR NEXT