A Thursday
A Thursday 
मनोरंजन

Movie Review: निराशाजनक, कंटाळवाणा, रटाळ असा A Thursday

युगंधर ताजणे

entertainment news: ज्यांनी नसरुद्दीन शहा यांचा व्हेन्सडे पाहिला (Bollywood Movies) असेल, इरफान खान यांचा मदारी पाहिला असेल त्यांना यामीचा थर्स डे निव्वळ पोरकटपणा वाटू शकतो. त्यात फारसं काही नाविन्य नाही. नैना जैसस्वाल (यामी गौतम) ही तिच्या (entertainment) आवडीसाठी एक लहान मुलांसाठी पाळणाघर चालवते. मात्र अचानक ती जे काही करते ते पाहून प्रेक्षकाला धक्का बसल्याशिवाय राहत नाही. नैनानं आतापर्यत तिच्या स्वभावामुळे त्या परिसरातील अनेकांना आपलसं केलं आहे. त्यामुळे ती जे काही करते आहे यावर कुणाचा विश्वास नाही. तिनं एक दोन नव्हे तर 16 लहान (Bollywood Actress) मुलांना ओलीस ठेवून घेतलं आहे. ती त्यांना सोडायला तयार आहे मात्र तिच्या काही अटी आहेत. त्या कोणत्या, नैना अशी का वागते, तिच्या अचाट मागण्या पूर्ण होतात का... या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला थर्स्ट डे पाहावा लागेल.

आपल्यावर काही प्रसंग ओढावले असतील, त्यातून आपल्या आयुष्याची राख रांगोळी झाली असेल, घरच्यांना मनस्ताप सहन करावा लागला असेल, हे जे कुणी केले त्यांच्याविरोधात पोलीस प्रशासनाकडे तक्रार करुनही त्यांनी त्याची दखल घेतली नसेल तर....अशा प्रकारचे शल्य गेली कित्येक वर्षे मनात ठेवून जगणाऱ्याचा स्वभाव कसा असेल, त्याच्या समाजाकडून काय अपेक्षा असतील, तो आपल्याला जसा वाटतो तसा आहे का, तो मानसिक रुग्ण तर नाही ना, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला यामीचा (yami Gautami) हा चित्रपट पाहिल्यावर पडण्याची दाट शक्यता आहे. यामीनं जे केलं ते चूकीचे की बरोबर याचं उत्तर दिग्दर्शक प्रेक्षकांवर सोडून देतो. त्यामुळे आपण जे पाहतो ते खर असतचं असं नाही, त्यामागे अनेक गोष्टींचा संदर्भ तुमच्या आयुष्याला चिकटलेला असतो हे लक्षात यायला लागतो. हे या निमित्तानं आपण अनुभवतो.

नैनानं आता 16 मुलांना किडनॅप करुन मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. त्या मुलांना काही करुन सोडवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. पावसाचे दिवस आहे. पोलिसांना हा टास्क पूर्ण करण्यासाठी दबाव वाढतो आहे. त्यामुळे ते त्या मुलांच्या पालकांवर चिडताना दिसत आहे. दुसरीकडे नैनानं जे काही प्लॅनिंग केलं आहे ते फार भारी असं मुळीच नाही. ज्यांनी मनी हाईस्टसारख्या सीरिज पाहिल्या असतील त्यांना तर नैनाचं प्लॅनिंग आणि पोलिसांचे शोधकार्य पाहून काही काळ हसू येण्याची शक्यता आहे. आता हे सगळं प्रकरण मीडियानं उचलून धरलं आहे. त्यामागेही एक खास कारण आहे. ते काय...याचंही उत्तर तुम्हाला थर्स्ट डे मधून मिळेल.

दिग्दर्शक बेहजाद खंबाटा यांनी काळ प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. कथाही वेगवान आहे. प्रेक्षक त्या कथेमध्ये गुंतत जातो. मात्र तरीही आपण फार काळ त्यात अडकून राहत नाही. काही ठिकाणी ती पकड सैल झालेली दिसते. यामी सोबत अतुल कुलकर्णी, कल्याणी मुळे, डिंपल कपाडिया यांच्याही भूमिका या चित्रपटात आहे. गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या वास्तव घटनेवर आधारित मालिका आणि चित्रपट पाहण्याची सवय झालेल्या प्रेक्षकाला नैनानं 16 मुलांना ओलीस ठेवण्याचे जे कारण पुढे केले आहे ते ऐकून काही काळ धक्का बसल्याशिवाय राहत नाही. यामीच्या अभिनयाचं कौतूक करायला हरकत नाही. बऱ्याच दिवसांनी तिचा जरा हटक्या पद्धतीचा अभिनय दिसुन आला आहे. पोलीस अधिकारी जावेद खान (अतुल कुलकर्णी), नेहा धुपिया यांना फारसा वाव नाही. पण अतुल यांनी आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

चित्रपटाचे नाव - थर्स्ट डे

दिग्दर्शक - बेहजाद खंबाटा

कलाकार - यामी गौतमी, नेहा धुपिया, अतुल कुलकर्णी, डिंपल कपाडिया.

स्टार - **

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT