amitabh 
मनोरंजन

१७ वर्षांनंतर पुन्हा परतला 'शांताराम', अमिताभ यांचं नाव चर्चेत मात्र पुन्हा बिग बींच मौन

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- ग्रेगरी डेविड रॉबर्ट्स यांनी लिहिलेली कादंबरी 'शांताराम' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या १७ वर्षात या कादंबरीवर कधी सिनेमे येणार असल्याच्या तर कधी वेब सिरीज बनणार असल्याच्या चर्चा झाल्या आहेत. दरवेळी बिग बी अमिताभ बच्चन यांचं नाव या प्रोजेक्टशी जोडलं जातं. मात्र या कादंबरीवर आत्तापर्यंत ना सिनेमा बनलाय आणि नाही वेबसिरीज. इतकंच काय तर अमिताभ बच्चन देखील नेमकं हे प्रकरण आहे तरी काय याबाबत सांगण्यासही उत्सुक दिसत नाहीत.

बॉलीवूडमध्ये गुरुवार सकाळपासून चर्चा आहे की ग्रेगरी डेविड रॉबर्ट्स यांच्या 'शांताराम' या कादंबरीवर एक वेब सिरीज बनणार आहे ज्याच्या शूटींगची सुरुवात पुढच्या वर्षी भारतातंच जानेवारी महिन्यात सुरु होईल. तसं तर देशभरात कित्येक वर्षांपासून देशी आणि परदेशी प्रोजेक्टवर काम सुरु आहे मात्र याचं मुख्य आकर्षण गेल्या दोन वर्षांपासून महानायक अमिताभ बच्चन हेच आहेत.

या चर्चांनुसार अमिताभ बच्चन देखील या सिरीजचा एक भाग असतील आणि त्यात ते एका अपराध्याची भूमिका साकारतील असं म्हटलं जातंय. या कादंबरीवर वेबसिरीज आणि सिनेमा बनवण्याच्या चर्चा आत्तापासून नाही तर कित्येक वर्षांपासून सुरु आहेत. शांताराम नावाच्या या कादंबरीचं प्रकाशन २००३ साली झाली होतं. त्यावेळी हॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते रसेल क्रो यावर सिनेमा बनवण्यासाठी तय्यार होते मात्र मध्येच प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप यांची एंट्री झाली आणि त्यांनी या कादंबरीचे हक्क खरेदी केले. त्यानंतर त्यांनी या कादंबरीवर सिनेमा बनवण्याची तयारी सुरु केली.          

movie shooting will start next year shantaram amitabh bachchan may par of it  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT