Moving In With Malaika esakal
मनोरंजन

Moving In With Malaika: 'आता तू माझ्यावरच...' ?' बहिणींमध्येच जुंपली! मलायका-अमृताचा वाद चव्हाट्यावर

अमृता अरोरा ही मलायकाची बहिण. ती देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र एका कारणामुळे तिची आणि मलायकाची भांडणं झाल्याचे दिसून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Moving In With Malaika : बॉलीवूडची स्टार अभिनेत्री मलायकाच्या आयुष्यावर आधारित मुव्हिंग इन विथ मलायका नावाची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे वादही समोर आले आहेत, अशातच आणखी एका वेगळ्या गोष्टीमुळे मलायकानं लक्ष वेधून घेतले आहे.

मलायकाविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या वेगळ्या लूकमुळे चर्चेत असते. वयाची चाळीशी केव्हाच पार केलेल्या मलायकाचे फोटो पाहणे आणि त्यावर प्रतिक्रिया देणे हा तिच्या चाहत्यांचा खास आवडीचा विषय आहे. मलायका इंस्टावर सर्वाधिक सर्च होणारी सेलिब्रेटी आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. आपल्या मालिकेतून तिनं तिच्या वाट्याला संघर्ष किती मोठा होता, बॉलीवूडमध्ये स्वताला सिद्ध करणे किती अवघड आहे याविषयी सांगितले आहे.

अमृता अरोरा ही मलायकाची बहिण. ती देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र एका कारणामुळे तिची आणि मलायकाची भांडणं झाल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर तो व्हिडिओ ट्रेंडिंग आहे. कॅमेऱ्यासमोर नेहमीच हसताना समोर आलेल्या या बहिणींमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. पापाराझ्झींच्या कॅमेऱ्यामध्ये तो व्हिडिओ कैद झाला आहे. मुव्हिंग इन विथ मलायकाच्या एका एपिसोडमध्ये त्यांची भांडणं ही व्हायरल झाली असून मलायकाच्या त्या व्हिडिओनं चाहत्यांना मोठा धक्काच दिला आहे.

यापूर्वी देखील मलायकाच्या मुव्हिंग इन विथ मलायकाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. मलायकानं अमृतावर एक जोक शेयर केला होता, तो अमृताच्या जिव्हारी लागला त्यानंतर दोघींमध्ये भांडणं झाल्याचे दिसून आले आहे. अमृतानं म्हटले आहे की, त्यादिवशी मी तर काहीच बोलले नव्हते. मात्र त्यावरुन माझ्यावर कमेंट करणे चुकीचे आहे. मलायकानं बोलताना थोडी तरी काळजी घ्यायला हवी होती. तसे झाले नाही आणि माझ्यावरुन जोक्स करण्यात आले. याचे वाईट वाटते. अशा शब्दांत अमृतानं तिची खंत व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT