gautami deshpande, mrunmayee deshpande SAKAL
मनोरंजन

Mrunmayee Deshpande - Gautami Deshpande: दत्तक घेतलेली मुलगी.. गौतमीच्या वाढदिवसाला मृण्मयी हे काय म्हणाली

मृण्मयीने सोशल मिडीयावर एकदम मजेशीर कॅप्शन शेयर केली आहे

Devendra Jadhav

Mrunmayee Deshpande - Gautami Deshpande: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे धाकटी बहीण गौतमी देशपांडे सोबत अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करत असते. आज गौतमीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मृण्मयीने सोशल मिडीयावर एकदम मजेशीर कॅप्शन शेयर केली आहे. त्यानिमित्ताने गौतमीचा वाढदिवसापेक्षा मृण्मयीच्या पोस्ट्सची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

(mrunmayee deshpande shares birthday post to her sister gautami deshpande)

गौतमीच्या वाढदिवसाला मृण्मयी लिहिते, "आमची दत्तक घेतलेली मुलगी गौतमी देशपांडे हीचा आज happy birthday आहे. आज ती वयानी खूप मोठी झाली आहे.. देव करो आणि वयाला लौकरात लौकर बुद्धी, शहाणपणा, समजूतदार पणा याची पण साथ मिळो.. बाकी प्रेम आहेच...

" I love you to the moon and back हे लिहावं लागतचं.. म्हणजे ते खरं पण आहेच... So I love you to the moon and back... You are my everything... My entire world... My happiness...ता.क - So I love you पासून वाचा pls आधीच मनातलं होतं... चुकून लिहिलं गेलं..."

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची धाकटी बहीण गौतमी 'झी-मराठी'वरील 'माझा होशील ना' या मालिकेतून घराघरात पोहोचली. गौतमी सोशल मीडियावर हल्ली चर्चेत असते ते तिच्या सोशल मीडियावरील वावरामुळे. याशिवाय ती सध्या रिल्स मुळे सोशल मिडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. दोघी बहिणी सतत काहीतरी नवीन पोस्ट करत असतात. गौतमी आज ३० वर्षांची झाली आहे.

गौतमी आणि मृण्मयी यांच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचं झालं तर.. माझा होशील ना मालिकेनंतर गौतमी कोणत्याही नवीन प्रोजेक्ट मध्ये दिसली नाही. मृण्मयी शेवटी फत्तेशीकस्त सिनेमात दिसली. मृण्मयी आणि गौतमी दोघांच्याही नवीन सिनेमा, मालिका, नाटकाची त्यांचे फॅन्स वाट पाहत आहेत. दोघी बहिणींना एकत्र पाहण्यास सुद्धा त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत. मृण्मयी - गौतमीने आजवर कधीही एकत्र काम केलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT