MS Dhoni Reveals FIRST LOOK Poster Of Maiden Production Venture Let's Get Married Esakal
मनोरंजन

MS Dhoni: एमएस धोनीच्या 'लेट्स गेट मॅरीड' चित्रपटाचं पोस्टर रिलिज...सोशल मिडियावर व्हायरल..

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याच्या प्रोडक्शन हाऊस धोनी एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली चित्रपट निर्मितीमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. धोनीच्या निर्मिती खाली बनत असलेल्या पहिल्या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं आहे.

Vaishali Patil

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याच्या प्रोडक्शन हाऊस धोनी एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली चित्रपट निर्मितीमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. धोनीच्या निर्मिती खाली बनत असलेल्या पहिल्या चित्रपटाचं नावही समोर आलं आहे.

या चित्रपटात दक्षिणेतील प्रसिद्ध कलाकार दिसणार आहेत. धोनीच्या चित्रपटात हरीश कल्याण आणि इवाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश थमिलमनी करणार आहेत. 'लेट्स गेट मॅरीड' हे नाव असलेला हा चित्रपट धोनी एन्टरटेन्मेंट कंपनीचा एक मोठा ड्रीम प्रोजेक्ट असल्याच त्याने सांगितलं आहे.

लेट्स गेट मॅरीड या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर नुकतच समोर आलं आणि काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

MS धोनी लेट्स गेट मॅरीडचा फर्स्ट लुक त्याच्या फेसबुकवर शेअर केला आहे. धोनीने हे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलयं की , "#LGM - लेट्स गेट मॅरीडच्या पहिल्या लूक पोस्टर रिव्हिल करताना आनंद झाला. एका चांगल्या कौटुंबिक मनोरंजनासाठी सज्ज व्हा जे तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल! संपूर्ण टीमला शुभेच्छा. धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड."

या पोस्टरमध्ये नायक हरीश कल्याण, नायिका इवाना आणि ज्येष्ठ अभिनेत्री नादिया लग्नाच्या नादात अडकलेले दिसत आहेत. हा चित्रपट रमेश थमिलमनी दिग्दर्शित करत असून हा एक फुल कॉमेडी मनोरंजनाचा तडका असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात योगी बाबू आणि आरजे विजय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

धोनी या चित्रपटाचे पोस्टर रिलिज करताच त्याच्या चाहत्यांनी त्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर हा चित्रपट सुपरहिट होणार असल्याची हमीही धोनीला दिली आहे. MS धोनीची फॅन क्रेझ किती आहे हे काही वेगळ सांगायची गरज नाही त्यामुळे याचा फायदा नक्कीच त्याच्या आगामी चित्रपटाला होईल हे नक्कीच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Miss Universe 2025 : ज्युरीचं स्पर्धक मॉडेलशी अफेअर, जजने फायनलच्या ३ दिवस आधी दिला राजीनामा; सगळं आधीच ठरल्याचा आरोप

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

RTO Scam:'आरटीओच्या जाहिरातीतून फसवणुकीचा नवा फंडा; १९९९ रुपयात वाहन न चालवताच परवाना देण्याचे अमिष, काय आहे वास्तव..

Latest Marathi Breaking News Live Update : "कल्याण-डोंबिवलीत महापौर भाजपचाच"- नरेंद्र पवार

SCROLL FOR NEXT