Mukesh Khanna news esakal
मनोरंजन

Mukesh Khanna: मुलींनी सेक्सची मागणी करणं असभ्य; 'शक्तिमान' ट्रोल

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या मालिकांमध्ये शक्तिमानचे नाव घेतले जाते. त्या मालिकेमध्ये मुकेश खन्ना यांनी महत्वाची भूमिका केली होती.

युगंधर ताजणे

Tv Entertainment News: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या मालिकांमध्ये शक्तिमानचे नाव घेतले जाते. त्या मालिकेमध्ये मुकेश खन्ना यांनी महत्वाची भूमिका केली होती. मुकेश खन्ना हे नेहमीच त्यांच्या (Mukesh Khanna) वेगवेगळ्या वक्तव्यांवरुन चर्चेत राहणारे सेलिब्रेटी आहे. सोशल मीडियावरुन ते राजकीय, सामाजिक परिस्थितीवर परखडपणे काही वक्तव्यं (Tv Serial Shaktiman) करत असतात. मात्र आता त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. त्यांनी थेट मुलींच्या सेक्स लाईफवर टोकाचं विधान केलं आहे. त्यामुळे मुकेश खन्ना ट्रोल होताना दिसत आहे.

यापूर्वी देखील वेगवेगळ्या सेलिब्रेटींवर मुकेश खन्ना यांनी आगपाखड केली (Viral Social media news) आहे. सरकारवर टीका करणाऱ्या सेलिब्रेटींना देखील मुकेश खन्ना यांनी धारेवर धरले होते. मुकेश खन्ना यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी मुलींच्या लैंगिक आयुष्यावरुन केलेलं विधान नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मुकेश खन्ना यांनी त्यांच्या युट्युबवरील चॅनेलच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी बोलताना एक अजबच वक्तव्य केलं आहे. यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

आपल्या त्या व्हिडिओमध्ये मुकेश खन्ना म्हणतात की, समजा एका मुलगी दुसऱ्या एका मुलासोबत लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त करते तर तिला तुम्ही काय म्हणाल, मुकेश खन्ना यांनी यावेळी वापरलेल्या शब्दांवरुन त्यांना टीकेचा सामना करावा लागला आहे. नेटकऱ्यांनी त्यांना तुम्हाला अशाप्रकारे प्रतिक्रिया देण्याचा काय अधिकार असे म्हटले आहे. यापूर्वी देखील शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनी अशाच प्रकारचे टोकाचे वक्तव्य करुन वेगळ्याच चर्चेला तोंड फोडले होते. लोकांनी अशा प्रकारच्या चर्चांमध्ये पडू नये असेही मुकेश खन्ना म्हटले आहे.

जर एखादी मुलगी एखाद्या मुलाला स्वताहून लैंगिक संबंध ठेवण्यावरुन विचारत असेल तर तुम्ही त्या मुलीप्रती काय विचार कराल, कोणतीही मुलगी अशाप्रकारची मागणी करु शकत नाही. तेव्हा आपण एक जागरुक नागरिक म्हणून काही गोष्टींचा विचाक करणं गरजेचं आहे. यावर एका नेटकऱ्यानं मुकेश खन्ना यांना म्हटलं आहे की, सॉरी शक्तिमान मात्र यावेळी तुम्ही दिलेली प्रतिक्रिया आवडली नाही. तुम्ही तुमची रुढीवादी विचारसरणी कायम ठेवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election साठी भाजप-शिवसेना एकत्र, पण राष्ट्रवादीचा उल्लेख नाही, जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला!

School Ragging Case : सरकारी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या डोक्याचे केस, भुवया ब्लेडने कापल्या; रॅगिंगच्या धक्कादायक प्रकाराने पालघर हादरले

'लाज कशी वाटत नाही' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत चाहत्यांनी केलं गैरवर्तन, धक्काबुक्कीला वैतागून जोरात ओरडली, viral Video

ICICI Prudential AMC IPO : GMP मध्ये मोठी उसळी! ₹2535 वर उद्या लिस्टिंगची शक्यता; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी?

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेडच्या मुखेडमध्ये जाहीर सभेसाठी उपस्थित; नगरपालिकेच्या प्रचारासाठी सभा

SCROLL FOR NEXT