muktaai marathi movie directed by digpal lanjekar announcement on dasara 2023 SAKAL
मनोरंजन

Muktaai Movie: नवे सीमोल्लंघन…शिवचरित्राचे अष्टक बनवणारे लांजेकर घेऊन येत आहेत ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाची कथा

आज दसऱ्याच्या मुहुर्तावर दिग्पाल लांजेकरांनी आगामी सिनेमाची घोषणा केलीय

Devendra Jadhav

Muktaai - Sudhir Phadke Biopic News: आज दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर अनेक नवनवीन मराठी सिनेमांची घोषणा होत आहे. अशातच शिवचरित्र अष्टक माध्यमातुन शिवरायांची शौर्यगाथा घराघरात पोहोचवणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांनी नवीन सिनेमाची घोषणा केलीय. हा सिनेमा म्हणजे मुक्ताई. आज दसऱ्याच्या मुहुर्तावर मुक्ताईची अधिकृत घोषणा करण्यात आलीय.

(muktaai marathi movie directed by digpal lanjekar announcement on dasara 2023)

शिवराज अष्टक नंतर दिग्पाल लांजेकर आणत आहेत मुक्ताई

शिवराज अष्टक नंतर दिग्पाल लांजेकर यांनी आज दसऱ्याच्या मुहुर्तावर नवीन सिनेमाची घोषणा केलीय. हा सिनेमा म्हणजे मुक्ताई. आज सोशल मीडियावर पोस्ट करुन दिग्पाल यांनी सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलं.

"संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची चिमुकली पण आभाळ व्यापून उरणारी बहीण मुक्ताई … तिच्या दिव्यदृष्टीने पाहिलेली ज्ञानेश्वरांच्या दैवी कुटुंबाची कथा !" असं कॅप्शन देत दिग्पाल यांनी मुक्ताई सिनेमाची घोषणा केलीय.

या तारखेला होणार मुक्ताई सिनेमा रिलीज

दिग्पाल लांजेकर यांनी मुक्ताई ची अधिकृत घोषणा केलीय. या सिनेमाच्या माध्यमातुन बऱ्याच कालावधीनंतर संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या कुटुंबाची कहाणी लोकांना पाहता येईल.

जुन्या मराठी सिनेमांंमध्ये अनेक सिनेमे संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या आयुष्यावर आधारीत असल्याचं पाहायला मिळेल. पण सध्याच्या आधुनिक काळात दिग्पाल लांजेकर मुक्ताई सिनेमाच्या माध्यमातुन संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या कुटुंबाची कहाणी मोठ्या पडद्यावर बघायला मिळेल. मुक्ताई सिनेमा जुन २०२४ मध्ये भेटीला येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Tenancy Agreement Rule: भाडेकरू आणि घरमालकांनो लक्ष द्या... सरकारकडून ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू; काय आहेत नवे नियम?

Dondaicha News : दोंडाईचा नगर परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्षांसह ७ नगरसेवक बिनविरोध

Kolhapur Shivaji University: पदव्युत्तर अभ्यासकेंद्रांना कुलूप, अभ्यासक्रम बंद करण्यासाठी महाविद्यालयांचा प्रस्ताव

Jaykumar Rawal : तोंडाला फेस आणणारी घोडदौड; दोंडाईचा निवडणुकीत नगराध्यक्षपद व ७ जागा बिनविरोध, मंत्री जयकुमार रावल यांचा वरचष्मा

SCROLL FOR NEXT