pravin tarde 
मनोरंजन

'मुलांना ट्रिपला थंड हवेच्या ठिकाणी जरुर न्या पण..'; प्रवीण तरडेचा मोलाचा सल्ला

स्वाती वेमूल

महाराष्ट्रातील गडकिल्ले म्हणजे राज्याच्या स्वाभिमानाचा इतिहास आहे. या गडकिल्ल्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाची ओळख नवीन पिढीला सातत्याने होत असते. पालकांनी आवर्जून आपल्या मुलांना या गडकिल्ल्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगावा, त्यांना आपल्या समृद्ध इतिहासाची ओळख करून द्यावी, असा सल्ला दिग्दर्शक प्रवीण तरडेनं दिला आहे. प्रवीण तरडेनं त्याच्या मुलासोबत काही फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. 

या फोटोंमध्ये प्रवीण तरडे सिंहगडावर बसून मुलाला 'श्रीमान योगी' ही कादंबरी वाचून दाखवताना दिसत आहेत. श्रीमान योगी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी आहे. 'मुलांना ट्रिपला थंड हवेच्या ठिकाणी जरुर न्या, पण आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं गरम रक्त सांडलं त्या गडकिल्ल्यांवर न्यायला विसरू नका. तिथं बसून त्यांना शिवचरित्र वाचून दाखवा. आजची संध्याकाळ सिंहगडवर', असं त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं. 

प्रवीण तरडेचा 'सरसेनापती हंबीरराव' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळवणारे हंबीरराव मोहिते यांचा जीवनप्रवास या चित्रपटात उलगडणार आहे. जून २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT