mumbai actress filed police complaint against akash rajveer who demanded her physical relationship and threat to kill  SAKAL
मनोरंजन

Crime News : सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवुन शरीरसंंबंधाची केली मागणी, मुंबईत राहणाऱ्या अभिनेत्रीने पोलिसात केली तक्रार दाखल

मुंबईत राहणाऱ्या एका अभिनेत्रीवर कास्टिंग काऊचचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय

Devendra Jadhav

बॉलिवूड इंडस्ट्री ही अशी आहे की इथे झगमगत्या पडद्यामागे काळी बाजू सुद्धा दडली आहे. चमचमत्या मनोरंजन विश्वामागे अशा घटना घडत असतात की ज्यातुन या इंडस्ट्रीचा काळी बाजू समोर आलीय.

अशातच इंडस्ट्रीतुन कास्टींग काऊच झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. २९ वर्षीय नवोदित अभिनेत्रीसोबत ही घटना घडल्याची माहिती समजतेय. जाणुन घ्या काय आहे प्रकरण.

(mumbai actress police complaint against akash rajveer who demand her physical relationship and threat to kill her)

बॉलिवूडमध्ये काम मिळवुन देण्याच्या नावाखाली शारिरीक सुखाची मागणी

अलीकडेच मुंबईत अभिनेत्रीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिला त्रास देणाऱ्या व्यक्तीला अटक केली. हा 29 वर्षीय व्यक्ती चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी त्या अभिनेत्रीला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगत होता.

चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी अभिनेत्रीला लैंगिक संबंध ठेवण्यास सांगणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून २९ वर्षीय अक्षय उर्फ ​​आकाश राजवीर भुंबक याला सांताक्रूझ येथून अटक केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय महिला जोगेश्वरी येथे राहत असुन बॉलिवूडमध्ये आपले करिअर करण्यासाठी प्रयत्न करतेय. सध्या मात्र ती नोकरी करून आपला उदरनिर्वाह करते.

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातुन साधला संवाद

सिनेक्षेत्राशी निगडित काही लोकांशी या अभिनेत्रीची चांगलीच ओळख होती. बॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांचे व्हॉट्सअॅपवर दोन ते तीन ग्रुप असून तिला या ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. या ग्रुपमध्ये अक्षयही होता.

त्याने अभिनेत्रीचा मोबाईल नंबर घेतला आणि तिला फोन केला. एका शोमध्ये तिला काम देण्याचे आश्वासन देऊन त्याने अभिनेत्रीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली पण अभिनेत्रीने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली.

आरोपीन केली शिवगाळ अन् जीवे मारण्याची दिली धमकी

15 ऑगस्ट रोजी आरोपीने अभिनेत्रीला पुन्हा फोन करून एका निर्मात्याचा पत्ता पाठवला. त्याने अभिनेत्रीला निर्मात्याकडे जाऊन तो सांगेल तसे करायला सांगितले. कथित आरोपीने अभिनेत्रीला सांगितले की, जर निर्माता खुश असेल तर तिला त्याच्या चित्रपटात भूमिका मिळेल.

यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्याने तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर अभिनेत्रीने अक्षय विरोधात ओशिवरा पोलिसात तक्रार दाखल केली. अटक झाल्यानंतर अक्षयला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update: राज ठाकरे मातोश्रीवर दाखल!

SCROLL FOR NEXT