mumbai based model manvi raj allegations of love jihad against ranchi grooming modeling agency owner viral  Esakal
मनोरंजन

Ranchi News: प्रसिद्ध मॉडेलिंग कंपनी अश्लीलता आणि लव्ह जिहादचा अड्डा! मॉडेलचा गंभीर आरोप..

Vaishali Patil

Model Manvi Raj: झारखंडची राजधानी रांचीमध्ये असलेल्या यश मॉडेलिंग कंपनी तेव्हा चर्चेत आली ज्यावेळी तिथल्याच एका मॉडेलनं या इंस्टीट्यूटवर लव्ह जिहाद आणि अनेक गंभीर आरोप केले आहे.

मॉडेल मानवी राजने हिने यश मॉडेलिंग कंपनीवर हे आरोप केले आहेत. इतकच नाही तर मॉडेलने कंपनीच्या ऑपरेटरवर अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचा आरोपही केला आहे.

याबाबत तिने एक व्हडिओ शेयर केला आहे ज्यात तिनं मॉडेलिंग कंपनीमध्ये धर्म बदलण्यासाठी दबाव निर्माण केला जात असल्याचा गंभीर आरोप तनवीर अख्तर नावाच्या व्यक्तीवर आरोप केला आहे.

ती यापूर्वी रांचीमध्ये यश मॉडेलिंगमध्ये काम करत होती. याच दरम्यान दोघांची ओळख झाली. त्यानंतर तनवीर अख्तर हा तिला काही काळापासून ब्लॅकमेल करत असल्याच तिनं सांगतिलं. त्यानंतर ती रांचीसोडून मुंबईला आली. तरीही तनवीर तिचा पाठलाग करत होता. त्यामुळे शेवटी कंटाळून तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे

पण इथेही आरोपी तिचा पाठलाग सोडला नाही. त्यामुळे त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर याबाबत मुंबई पोलिसांनी हे प्रकरण रांची येथे वर्ग केले आहे. पुढील तपास सुरु आहे.

तिच्या तक्रारीत तिने पोलिसांना सांगितलं की, तिची रांचीमधील एका ग्रूमिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाशी मैत्री होती. पहिल्या भेटीत तनवीरने त्याचं नाव यश असे सांगितलं. पण, नंतर तिला कळालं की त्याचं खरे नाव यश नसून तनवीर आहे

पीडितेने पोलिसांना सांगितले की, मैत्री झाल्यानंतर होळीच्या दिवशी तिला गोळ्या खाऊ घालून तिचे काही फोटो काढले होते. यानंतर तनवीरने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आरोपी तनवीरने धर्म बदलून तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला. यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मात्र, मानवीने ज्याच्यावर हे आरोप केले आहेत त्याने देखील त्याचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. तन्वीरने मानवीचे हे आरोप साफ खोटे असल्याच सांगत ते फेटाळून लावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेत ७० तासांनतरही बचावकार्य सुरु! ढिगाऱ्याखाली ३ जण जिवंत दिसले, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला देणार भेट

Pune Palkhi Sohala : विठू नामाचा गजर अन् डोळ्यात पाणी! दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊली-तुकोबांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ, पुण्यनगरी भावुक, 'असा' दिला निरोप

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिका 'या' तारखेपासून ; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री पहिली मॅच...

FDA Milk Raid Rumour : तुकाराम मुंडेंची एवढी भीती? FDA धाडीच्या एका अफवेने दूध चालकांनी शेकडो लिटर दूध ओतलं रस्‍त्‍यावर; 'त्या' व्हिडिओनं वाढवलं दुधातील भेसळीचं गूढ

SCROLL FOR NEXT