मनोरंजन

भावंडांसाठी काहीपण! कंगनाने भेट दिले ४ आलिशान फ्लॅट्स

स्वाती वेमूल

मुंबई : सतत वादग्रस्त विधान करत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत सध्या तिच्या दिलदारपणामुळे चर्चेत आली आहे. बहीण रंगोली चंडेल आणि भावंडांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर राहणाऱ्या कंगनाने आता त्यांना चक्क चार फ्लॅट्स भेट म्हणून दिले आहेत. बहीण रंगोली, भाऊ अक्षत आणि इतर दोन भावंडांसाठी कंगनाने चंदीगडमध्ये चार फ्लॅट्स विकत घेतले आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, या चार फ्लॅट्ससाठी तिने चार कोटी रुपये खर्च केले आहेत. 

कंगनाने कोणत्या ना कोणत्या मार्गाने नेहमीच तिच्या भावंडांची मदत केली आहे. आता चौघांना चार फ्लॅट्स भेट देऊन तिने पुन्हा एकदा तिचं प्रेम व्यक्त केलंय, असं तिच्या जवळच्या व्यक्तींनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितलं. चंदीगड विमानतळापासूनच जवळच अत्यंत प्रतिष्ठित ठिकाणी तिने हे फ्लॅट्स घेतले असून जवळपास मॉल्स आणि रेस्टॉरंट्ससुद्धा आहेत. याआधी कंगनाने भाऊ अक्षतच्या लग्नाचा पूर्ण खर्च उचलला होता. उदयपूरमध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता. 

कंगनाच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी बोलायचे झाल्यास, ती सध्या 'थलायवी' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये ती तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय 'तेजस' आणि 'धाकड' हे तिचे दोन चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत.

mumbai entertainment news kangana ranaut gifts 4 flats to rangoli chandel and other cousins

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT