Alia Bhatt 
मनोरंजन

Alia Bhatt : मुंबई पोलिसांनी आलिया भट्टशी साधला संपर्क! म्हणाले, "तक्रार करा..."

सकाळ डिजिटल टीम

आलिया भट्ट तिच्या घरात आराम करत असल्याचे छायाचित्र एका मीडिया पोर्टलवर समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूडने त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. फोटोमध्ये आलिया भट्ट तिच्या घरात बसलेली दिसत आहे. हे चित्र जवळच्या इमारतीतून झूम लेन्सद्वारे क्लिक केले आहे. आलिया भट्टनंतर, अनुष्का शर्मा आणि जान्हवी कपूर यांनीही त्यांचे अनुभव शेअर केले आहेत आणि हे गोपनीयतेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांनी अभिनेत्री आलिया भट्टशी संपर्क साधला आहे आणि तिला एका छायाचित्रकाराने तिची खाजगी छायाचित्रे क्लिक केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास सांगितले. ही छायाचित्रे ऑनलाइन पोर्टलवर प्रकाशित झाली आहेत. आलिया भट्ट यांनी पोलिसांना सांगितले आहे की तिची पीआर टीम संबंधित पोर्टलच्या संपर्कात आहे.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

आलिया तिच्या लिव्हिंग रुममध्ये आराम करत असताना दोन पापाराझींनी फोटो काढून सोशल मीडियावर टाकले. जेव्हा आलियाला याची माहिती मिळाली तेव्हा तिला हे पाहून धक्का बसला. यानंचर तिने मुंबई पोलिसांना यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

आलिया भट्टने इन्स्टा स्टोरीमधील आपला एक फोटो शेअर केला होता, जो पापाराझीने घेतला आहे. ज्यामध्ये ती तिच्या लिव्हिंग रुमध्ये आराम करताना दिसते. या फोटोसोबत अभिनेत्रीने लिहिले की, नेहमीप्रमाणे मी दुपारी माझ्या घरी लिव्हिंग रुममध्ये विश्रांती घेत होते. तेवढ्यात मला असं वाटलं की कोणीतरी मला बघतंय. मी वर पाहिलं तर शेजारच्या इमारतीच्या छतावर कॅमेरे घेऊन दोन लोक दिसले.

एखाद्याचे असे फोटो घेणे कितपत शोभतं? असा सवाल आलियाने केला. गोपनीयतेचे उल्लंघन करण्याची हद्द झाली. तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडू शकत नाही. पण तुम्ही तुमची मर्यादा ओलांडली, असंच म्हणावं लागेल, असंही आलियाने आपल्या स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT