deepika and priyanka 
मनोरंजन

दीपिका पदूकोण आणि प्रियांकाची चोप्राची मुंबई पोलीस करणार चौकशी? 'या' प्रकरणात अडकण्याची शक्यता

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूडसाठी २०२० हे वर्ष जरा घातकंच ठरतंय. या वर्षात अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी जगाचा निरोप घेतला, एकीकडे सुशांतसारख्या उभरत्या कलाकाराने आत्महत्या केली तर दुसरीकडे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा बॉलीवूड घराणेशाहीच्या मुद्द्यामुळे बदनाम होऊ लागलं. या प्रकरणात अनेक बॉलीवूडकरांना पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलं त्यामुळे एक ना अनेक चर्चांना उधाण आलं. आता तर बॉलीवूडच्या दोन टॉपच्या अभिनेत्री असलेल्या दीपिका पदूकोण आणि प्रियांका चोप्राची मुंबई पोलीस चौकशी करणार असल्याचं म्हटलं जातंय मात्र कोणत्या प्रकरणात ते पुढे वाचा...

सोशल मिडियावर पेड किंवा बनावट फॉलोअर्स बनवल्याच्या घोटाळ्याची चौकशी सध्या मुंबई पोलीस करत असतात. पोलिसांच्या या तपासात बॉलीवूडच्या सेलिब्रिटींची चौकशी केली जाऊ शकते अशी चर्चा आहे. यामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदूकोण सारख्या सेलिब्रिटींची नावं समोर येत आहेत.

एका रिपोर्टनुसार, मुंबईचे सह पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना अशा ५४ संस्थांविषयी कळालं आहे ज्या बनावट सोशल मिडिया फॉलोअर्स बनवण्याच्या घोटाळ्यामध्ये सामील आहेत. या प्रकरणात सायबर सेलसोबत मुंबई पोलीस क्राईम ब्रांचची एक टीम देखील तपास करत आहे.

रिपोर्टमध्ये असं सांगितलं जातंय की बनावट सोशल मिडिया अकाऊंट बनवणा-या घोटळ्यामध्ये मुंबई पोलिसांच्या क्रिमिनस इंटेलिजन्स युनिटने अभिषेक दिनेश दौडेला अटक केली आहे. या प्रकरणात अनेक सोशल मिडिया मार्केटिंग कंपन्या देखील या पोलिस तपासाच्या रडारवर आल्या आहेत.  अटक झालेल्या अभिषेकने मुंबई पोलिसांना सांगितलं की तो एका विदेशी कंपनीसाठी काम करतो. 

गायिका भूमी त्रिवेदीने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती की तिने तिच्या नावाचं एक बनावट अकाऊंट पाहिलं आहे. तिने सांगितलं होतं की या बनावट इंस्टाग्राम अकाऊंटवरुन  इतर युजरसोबत चॅट देखील केलं गेलं आहे. यानंतर या तपासात मुंबई पोलिसांना हे आढळून आलं की अनेक खेळाडू, उद्योजक आणि बॉलीवूड सेलिब्रिटींसोबत जवळपास १७६ लोकांनी त्यांचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी पैसै दिले होते.   

mumbai police may question deepika and priyanka in fake social media followers scam  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2027: २०२७ च्या जनगणनेसाठी ११ हजार ७१८ कोटीची मंजुरी; दोन टप्प्यांत होणार प्रक्रिया

एकही झाड तोडू नका! तपोवनातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती, नाशिक महापालिकेला नोटीस

Latest Marathi News Live Update : गुन्हेगारी रिल्सवर पुणे पोलिसांचा दणका! ‘दो भाई, दोनो तबाही’ व्हिडिओप्रकरणी तरुणांवर कडक कारवाई

Panchang 13 December 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Sakal Vastu Plotting Expo : ‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’ आजपासून

SCROLL FOR NEXT