aditya chopra on sushant
aditya chopra on sushant 
मनोरंजन

सुशांत आत्महत्या प्रकरण: मुंबई पोलिसांनी आदित्य चोप्राची केली ४ तास चौकशी, मिडियापासून बचावासाठी बांद्रा ऐवजी 'या' पोलिसस्टेशनमध्ये झाली चौकशी

दिपालीराणे-म्हात्रे

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात सगळीकडून सीबीआय तपासाची मागणी होत आहे. त्यामुळे या प्रकरणात मुंबई पोलिसांवर खूप दबाव आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात ३० पेक्षा जास्त जणांची चौकशी झाली आहे. सुशांत नैराश्याने ग्रासला होता म्हणूनंच नुकतंच सुशांतवर उपचार करणा-या हिंदूजा हॉस्पिटलमधील मानसोपचार तज्ज्ञांंची देखील चौकशी झाली होती. आता या प्रकरणाला थोडा वेग मिळाला आहे. आज शनिवार रोजी यशराज फिल्म्सचे मालक आणि निर्माते आदित्य चोप्रा यांची देखील चौकशी करण्यात आली.  

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य चोप्रा यांची चौकशी बांद्रा पोलिसांनी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये केली. मिडियापासून सुरक्षित राहण्यासाठी आदित्यची चौकशी बांद्रा ऐवजी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली. वर्सोवा पोलिस स्टेशन आदित्य यांच्या बंगल्यापासून काही अंतरावरंच आहे. सकाळी ९ वाजता आदित्य वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्यानंतर जवळपास ४ तास पोलिसांनी त्यांची चौकशी केली.

या चौकशीमध्ये आदित्यला त्याच्या कंपनीसोबत सुशांतचे असलेले कॉन्ट्रॅक्ट आणि सोबतंच त्याला ऑफर केलेल्या सिनेमांच्या बाबतीत विचारणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शक शेखर कपूर सुशांत सिंह राजपूतसोबत 'पानी' हा सिनेमा बनवणार होते. या सिनेमाची आदित्य चोप्राचं प्रोडक्शन हाऊस यशराज फिल्म्स निर्मिती करणार होतं. मात्र कालांतराने हा सिनेमा रखडला तो पुढे झालाच नाही.

शेखर कपूर यांनी सांगितलं होतं की या सिनेमासाठी सुशांतने जवळपास ११ महिने जबरदस्त मेहनत केली होती. मात्र सिनेमा बंद पडल्यामुळे तो नैराश्यात गेला होता. यासोबतंच हे देखील आरोप आहेत की आदित्य चोप्राच्या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट असल्याने सुशांतच्या हातून अनेक मोठे सिनेमे निसटले होते. 

सुत्रांच्या माहितीनुसार, सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सीबीआय तपासाची मागणी केली होती. तेव्हापासून मुंबई पोलिसांवर या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पू्रण करण्यासाठी दबाव वाढला आहे. मात्र महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतंच स्पष्ट केलं होतं की या प्रकरणात सीबीआय तपासाची गरज नाही. यानंतरही महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा तपास लवकर पूर्ण होण्यासाठी दबाव टाकला आहे.    

mumbai police recorded aditya chopra statement in sushant singh rajput suicide case  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT