actress jacqueline fernandez  Team esakal
मनोरंजन

मुंबई पोलिसांनी मानले जॅकलीनचे आभार, कारण....

कोरोनाची दुसरी लाट (corona ) दिवसेंदिवस धोकादायक ठरताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - मुंबई पोलिसांनी (mumbai police thanks ) प्रसिध्द बॉलीवूडची अभिनेत्री जॅकलीनचे (actress jacqueline fernandez ) आभार मानले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. जॅकलीन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. श्रीलंकेतून आलेल्या जॅकलीनला भारतात आता मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला आहे. बॉक्स ऑफिसकवर तिचे चित्रपट चांगला व्यवसायही करतात. जॅकलीन केवळ अभिनयातच नाही तर सामाजिक कामांमध्येही अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी तिनं दिवाळीला आपल्या कर्मचा-यांना दिलेली भेट चाहत्यांच्या मनात आहे. (mumbai police thanks to actress jacqueline fernandez for lending a helping the safety for the force)

कोरोनाची दुसरी लाट (corona ) दिवसेंदिवस धोकादायक ठरताना दिसत आहे. आता बॉलीवूडमधील मोठमोठे सेलिब्रेटी शासनाच्या मदतीसाठी धावले आहेत. त्यांनी मदत करण्यास पुढाकार घेतला आहे. सेलिब्रेटी आता फ्रंटलाईन वर्कर्स झाले आहेत. त्यांच्या मदतीमुळे अनेकांचा उत्साह वाढला आहे. सोशल मीडियावर त्याचा चांगलाच गवगवा झाला आहे. यासगळ्यात जॅकलीन फर्नांडीसनंही ( jacqueline fernandez) कोरोनाच्या निमित्तानं मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

मुंबई पोलिसांची मदत करण्यासाठी तिनं पुढाकार घेतला आहे. त्यांना रेनकोट आणि सुरक्षेच्या दृष्टीनं वेगवेगळ्या वस्तू देण्यास तिनं सुरुवात केली आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी तिचे आभार मानले आहे. मुंबई पोलिसांनी तिच्या त्या भेटीचा स्वीकार करुन त्याचे फोटो आपल्या व्टिटर अकाऊंटवरुन प्रसिध्द केले आहे. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्या फोटोंमध्ये पोलिसांना देण्यात आलेला रेनकोट आणि अन्य काही सुरक्षेच्या वस्तु दिल्याचे दिसत आहे.

हे फोटो व्टिट करताना मुंबई पोलिसांनी लिहिले आहे की, जेव्हा जून महिना जवळ येऊ लागतो तेव्हापासून मुंबई पोलीस तयारीला सुरुवात करते. पावसाळा मोठा आव्हानात्मक असतो. मात्र त्यासाठी जॅकलीनचे मिळालेले सहकार्य मोठे आहे. आम्ही तिचे आभारी आहोत. आता कोरोनाच्या महामारी बरोबर मॉन्सूनपासूनही आमचे संरक्षण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT