music director sajid wajid mom reveals sajid wife lubna secretly donated kidney to wajid khan  
मनोरंजन

साजिदच्या पत्नीनं वाजिदला दिली होती किडनी; आईला रडू आले

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमधील अशा काही गोष्टी आहेत ज्याविषयी फार कमी जणांना माहिती आहे. आता आपण जाणून घेणार आहोत अशा संगीतकाराबद्दल ज्यानं आपल्या संगीतानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ज्यावेळी बॉलीवूडमधील प्रसिध्द संगीतकार साजिद - वाजिद मधील वाजिद यांनी जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या वर्षी जुनमध्ये वाजिद यांचे निधन झाले होते. त्यांच्या जाण्याचं दु:ख अद्यापही त्याच्या चाहत्यांच्या मनात आहे. आपल्या संगीतानं त्यांनी वेगळी उंची गाठली होती. त्यांच्या संगीताचा प्रभाव अद्यापही प्रेक्षकांच्या मनावर आहे. सध्या वाजिद यांच्या आठवणींना उजाळा मिळाला तो ज्यावेळी साजिद खान इंडियनं प्रो म्युझिक लीगमध्ये गेले होते त्यावेळी.

साजिद यांनी त्यावेळी आपल्या भावाच्या आठवणींना उजाळा दिला होता. वाजिद यांना किती मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं हे त्यांनी सांगितले होते. वाजिद यांच्या आजारपणाविषयी त्यांनी काही खुलासे आणि धक्कादायक माहिती शेअर केली होती. त्या शो ला साजिद - वाजिद यांची आई रजीना आणि साजिद यांची पत्नी लुबना उपस्थित होत्या. याप्रसंगी साजिद यांच्या आईनं सांगितलं की, साजिद यांच्या पत्नीनं वाजिद यांना आपली एक किडनी डोनेट केली होती. त्यानंतर 2019 मध्ये त्यांचे ऑपरेशनही झाले होते. रजीना यांचे म्हणणे होते की, लुबना यांनी त्यांना कोणालाही न सांगता आपली किडनी दिली होती. इंडियन प्रो म्युझिक लीगचा पूर्ण एपिसोड हा वाजिद यांना डेडीकेट करण्यात आला होता.

साजिद यांच्या आईनं सांगितलं की, मला स्वताला किडनी देता येणार नव्हती. कारण मी डायबेटीक आहे. हिंदूस्थान टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार आम्ही आमच्या काही नातेवाईकांनाही यावेळी विचारले होते मात्र कोणी पुढे आले नाही. लुबना यांनी कुणालाही न सांगता वाजिद यांना किडनी दान करण्याचा निर्णय घेतला होता. तो प्रत्यक्षात अंमलातही आणला होता. हे सगळं सांगत असताना साजिद यांच्या आईंना अश्रु अनावर झाले होते. 

लुबनी यांनी सांगितले, कोणीही किडनी डोनेट करु शकतो. असे म्हटल्यावर मी किडनी डोनेट करण्याचा निर्णय घेतला होता. वाजिद माझ्या निर्णयावर नाराज झाले होते. मात्र मी त्यांना एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे तुम्ही माझ्यासाठी फार महत्वाचे आहात. हे ऐकल्यावर त्यांच्याकडे दुसरे कुठले शब्द नव्हते. 
 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Riots 2002 : गुजरात दंगलीतील तीन आरोपींची २३ वर्षांनी निर्दोष मुक्तता; अनेक साक्षीदारांचा मृत्यू , पुरावे गायब, तपास अधिकारीही...

धक्कादायक घटना! 'कुळकजाईत एकाचा खून'; मृतदेह शेतात नग्नावस्थेत, माण तालुक्यात उडाली खळबळ; नेमकं काय घडलं..

पोलिस भरतीत एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन! अर्जासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत; पहिल्यांदा मैदानी‌ नंतर एकाचवेळी लेखी परीक्षा; परीक्षेबद्दल वाचा सविस्तर...

Satara Woman Doctor Case:' फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निलंबित उपनिरीक्षक गोपाल बदने बडतर्फ'; असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणूकचा ठपका

JEE, NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातील ५० विद्यार्थ्यांचा खर्च राज्य शासन भरणार; कशी होणार निवड?

SCROLL FOR NEXT