Meera Chopra Instagram
मनोरंजन

"कोव्हिडमुळे नाही तर अपुऱ्या सुविधांमुळे भावंडांचे प्राण गेले"; प्रियांका चोप्राच्या बहिणीचा संताप

मीरा चोप्राने गेल्या दहा दिवसांत तिच्या दोन भावंडांना गमावले.

स्वाती वेमूल

अभिनेत्री प्रियांका चोप्राची Priyanka Chopra चुलत बहीण मीरा चोप्रा Meera Chopra हिच्या कुटुंबातील दोन सदस्यांनी गेल्या दहा दिवसांत कोरोनामुळे आपले प्राण गमावले. जवळच्या व्यक्तींच्या निधनातून सावरत असतानाच मीराने सरकारवर आणि अपुऱ्या सोयीसुविधांवर संताप व्यक्त केला आहे. "माझ्या भावंडांचा मृत्यू कोरोनामुळे नाही तर अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे झाला", असं ती म्हणाली. (My cousins did not die of Covid but lack of medical infrastructure said priyanka chopra cousin Meera Chopra)

"मी माझ्या दोन जवळच्या भावडांना गमावलंय. पण त्यांचा मृत्यू कोरोनामुळे नाही तर वैद्यकीय सोईसुविधा अपुऱ्या पडल्यामुळे झाला आहे. माझ्या पहिल्या भावाला बेंगळुरूमध्ये दोन दिवस आयसीयू बेड मिळू शकला नाही आणि दुसऱ्या भावाचा मृत्यू ऑक्सिजनची पातळी अचानक घसरल्याने झाला", अशा शब्दांत मीराने तिची हतबलता व्यक्त केली. मीराच्या दोन्ही भावंडांचं वय चाळीशीच्या घरात होतं. "त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आम्ही काहीच करू शकलो नाही, याचं खूप वाईट वाटतंय. पुढे काय घडेल याचीच मला सतत चिंता सतावतेय. तुम्ही एखाद्याचा जीव वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करता, पण तरीही तुम्हाला त्यात यश मिळत नाही", असं मीरा म्हणाली.

हेही वाचा : ट्विटरनंतर कंगनाला इन्स्टाग्रामचा धक्का; डिलिट केली कोरोनाबाबतची 'ही' पोस्ट

सध्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबाबतही तिने राग व्यक्त केला. "मनात इतका राग आहे की, पहिल्यांदा मला असं वाटतंय की आपला देश खूप मागे गेलाय. आपण ऑक्सिजन, इंजेक्शन्स, औषधं, बेड्स उपलब्ध करून देऊ शकत नाही आहोत. सरकारने हे आपल्यासाठी केलं पाहिजे. पण त्यात सरकारला अपयश मिळत आहे", असं म्हणत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी सरकारने आधी तयारी का केली नाही, असा प्रश्न तिने उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT