naal 2 teaser out now marathi actor jitendra joshi comment on nagraj manjule naal 2 SAKAL
मनोरंजन

Naal 2 Teaser: "मला लई राग आला होता", नाळ चित्रपटाचा टीझर पाहून जितेंद्र जोशीची प्रतिक्रिया चर्चेत

नाळचा दुसरा टीझर पाहून जितेंद्र जोशीने भन्नाट प्रतिक्रिया दिलीय

Devendra Jadhav

नाळ 2 सिनेमाचा पहिला टीझर काही दिवसांपुर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. नाळ 2 सिनेमाच्या पहिल्या टीझरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता चाळवली गेली. याशिवाय काही दिवसांपुर्वी नाळ 2 मधलं भिंगोरी हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. आता नाळ 2 चा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा टीझर पाहून जितेंद्र जोशीने प्रतिक्रिया दिलीय ती चर्चेत आहे.

(naal 2 teaser out now marathi actor jitendra joshi)

नाळ 2 चा टीझर

नाळ 2 चा टीझरमध्ये पाहायला मिळतंय की, चैत्या त्याच्या आईसोबत दिसून येतो. छोट्या चैत्या आता मोठा झालाय. तो आईच्या गावच्या घरी आलेला दिसतोय. चैत्या सायकल घेऊन उभा असतो. आई त्याच्याकडे कौतुकाने पाहत असते.

चैत्याच्या सायकलच्या मागे आई बसते. चैत्या आईला घेऊन सायकल चालवायला लागतो. नाळ 2 चा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलंय.

नाळ 2 चा टीझर पाहून जितू म्हणाला...

नाळ 2 चा टीझर पाहून अभिनेता जितेंद्र जोशीने लिहीलंय की, "ती चैतू सोबत बोललीच नाही त्यामुळं मला लई राग आला होता तिचा.. चैतु पहात राहिला आणि मी रडत ..
आता मोठा झालाच आहे तर बोल गं बाई त्याच्याशी.. खूप खूप शुभेच्छा मित्रांनो..
पहिल्या भागाच्या आठवणींचा खजिना मोठा चैत्या पुन्हा उलगडणार,
येत्या दिवाळीत नात्यांची नाळ अजून घट्ट होणार!"

नाळ 2 ची रिलीज डेट

नाळ 2 मध्ये नागराज मंजुळे, श्रीनिवास पोकळे, दिप्ती देवी, देविका रफ्तरदार असे कलाकार प्रमुख भुमिकेत आहेत. हा सिनेमा १० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT