Prem Rakshith Naatu Naatu Golden Globes 2023 Esakal
मनोरंजन

Prem Rakshith: 'नाटू नाटू' च्या तालावर जगाला नाचवणारा कोरिओग्राफर आहे तरी कोण?

Vaishali Patil

गेल्या वर्षभरात RRR 'या चित्रपटात 'नाटू नाटू' या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. आता सध्या मनोरंजन विश्वात एकच चर्चा आहे ती एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' या चित्रपटाची.. या चित्रपटाने पुन्हा इतिहास रचला आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर आरआरआर चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे.

या गाण्याचे बोल तर सगळ्यांच्या हृदयाला भिडले आहे.‌ या गाण्यातील नृत्याने देखील सगळ्यांनाच वेड लावले. या गाण्याच्या हुक स्टेपनेही सर्वांनाच वेड लावलं. इतक्या एनर्जीनं हे गाणं तयार केलं तर या गाण्याला कोरिओग्राफर करणाऱ्या प्रेम रक्षित यांच्यावरही एक नजर टाकूया..

प्रेम रक्षित आणि एसएस राजामौली नातू नातू गाणे कोरिओग्राफ करत आहेत

प्रेम रक्षित यांनीच 'नाटू नाटू' गाण्याच्या धमाकेदार डान्स स्टेप्सची कोरिओग्राफी केली होती, ज्याने सर्वांना थक्क केले. ज्यांनी हे गाणं पाहिलं त्या प्रत्येकाला त्यावर नाचायला आणि त्याची हुकस्टेप कॉपी करायला भाग पाडलं.या गाण्यांमध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरण या जोडीने तर धुराडाच केला होता पण या गाण्याच्या स्टेप्सच्या मागे असलेली खरी व्यक्ती आहे ती म्हणजे प्रेम रक्षित

हेही वाचा - या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

आतापर्यंत प्रेम रक्षितने सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी चारहून अधिक फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. प्रेम रक्षितच्या मागील चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास या यादीत 'रंगस्थलम', बाहुबली 2, मेर्सल आणि तमिळ आणि तेलगूमधील काही सर्वात हिट चित्रपट आहेत.

त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सिनेमा एमए अवॉर्ड्स, फिल्मफेअर अवॉर्ड्स साउथ, संतोषम अवॉर्ड, सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शकाचा नंदी अवॉर्ड, संतोषम अवॉर्ड इत्यादी अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Hotel Fire : साखरझोपेत असतानाच मृत्यूने गाठले ! पहाटे हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

Chhatrapati Sambhajinagar Car Fire: जॅमर लावलेल्या कारला अचानक आग; छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरातील घटनेने खळबळ

झोपेतच घेतला अखेरचा श्वास! बॉलीवूड अभिनेत्रीचं २७ व्या वर्षी निधन, महिन्याभराने कुटुंबाने दिली माहिती

Marathi News Live Updates : पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा दुग्धशर्करा योग; त्र्यंबकेश्वरला भाविकांची अलोट गर्दी

१७ ऑगस्ट पंचांग! नागपंचमीसह श्रावणी सोमवार; जाणून घ्या शुभ-अशुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT