Bhool Bhulaiyaa 2 Remake Esakal
मनोरंजन

Bhool Bhulaiyaa 2 Remake: आता टॉलिवूडही करणार 'या' बॉलिवूड चित्रपटाची कॉपी! रिमेकची तयारी सुरु

Vaishali Patil

Bhool Bhulaiyaa 2 Remake: गेल्या काही काळापासून बॉलिवूड चित्रपटांची जादू ही जरा ओसरलेली  दिसत आहे. काही ठराविक चित्रपट सोडले तर बरेच चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरले. त्यातील बरेच चित्रपट हे साउथ सिनेमांचे रिमेक होते.

जसं शहजादा किंवा सलमान खानचा किसी का भाई किसी जान किंवा अक्षय कुमारचा सेल्फी... रिमेक असल्यामुळे या चित्रपटांना प्रेक्षकांचा फार कमी प्रतिसाद मिळाला.

मात्र आता टॉलिवूडदेखील बॉलिवूडचा चित्रपटाचा रिमेक करणार आहे. अक्षय कुमारच्या भूल भुलैया या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. या चित्रपटातील अक्षय कुमारचा लूकही प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यानंतर 'भूल भुलैया'चा भाग 2ही प्रदर्शित झाला.

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीच्या या चित्रपटानं प्रेक्षकांना भुरळ घातली. या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. आता 'भूल भुलैय्या 2' चा साऊथमध्ये रिमेक होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

'भूल भुलैय्या 2' ची निर्मिती केई ज्ञानवेल राजा करणार आहेत. हा चित्रपट तमिळ, तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग जुलै-ऑगस्ट महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती आहे. ज्ञानवेलने चित्रपटाचे हक्क विकत घेतल्याची पुष्टी केली आहे.

त्याचबरोबर दक्षिण भारतातील प्रेक्षकांच्या आवडीनुसार हा चित्रपट बनवला जाणार असल्याचं केई ज्ञानवेल राजा यांनी सांगितले.

कार्तिक आर्यनच्या भूमिकेसाठी केई ज्ञानवेल राजा यांनी नागा चैतन्य, वरुण तेज, कल्याण राम नंदामुरी आणि नितीन यांसारख्या कलाकारांचा विचार करत होते.

दरम्यान आता त्यांनी या चित्रपटासाठी नागा चैतन्यला फायनल केलं असल्याचं सांगण्यात येत आहे. तर तब्बूची भूमिका साकारण्यासाठी ज्योतिकाचं नाव चर्चेत होतं.

त्याबद्दल ज्ञानवेल म्हणाले, 'काहीच फायनल नाही. आम्ही फक्त तारखांची वाट पाहत आहोत. आम्ही कलाकार लवकरच फायनल करणार आहोत.

या साउथ चित्रपटाचं नाव ब्रह्मपुत्रा असेल, अशीही चर्चा मीडियात आहे. याबाबत ज्ञानवेल यांनी याला स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे आणखी काही वेगळ नाव किंवा बॉलिवूडमधीलच 'भूल भुलैया' हे नाव तसच ठेवणार अशीही चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

PMC Recruitment : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT