मनोरंजन

ट्विटरवर दिसला समंथा-नाग चैतन्यमधील दुरावा; चाहत्यांकडून नाराजी व्यक्त

स्वाती वेमूल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोडी समंथा रुथ प्रभू Samantha Ruth Prabhu आणि नाग चैतन्य अक्किनेनी Naga Chaitanya यांच्या नात्यातील दुराव्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. हे दोघं घटस्फोट घेणार असल्याचंही म्हटलं जात आहे. एकीकडे या चर्चा होत असताना आता ट्विटरवर समंथा आणि नाग चैतन्य यांच्या नात्यातील दुरावा स्पष्टपणे दिसला. यावर दोघांच्या चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. नाग चैतन्यचा 'लव्ह स्टोरी' Love Story या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. समंथाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हा ट्रेलर शेअर करत चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या ट्विटमध्ये तिने फक्त अभिनेत्री साई पल्लवीला टॅग केलं आहे. समंथाने जाणूनबुजून नाग चैतन्यला टॅग केलं नाही का, असा प्रश्न चाहत्यांनी ट्विटच्या कमेंट्समध्ये तिला विचारला आहे. 'लव्ह स्टोरी' या चित्रपटात नाग चैतन्य आणि साई पल्लवी मुख्य भूमिका साकारत आहेत.

'हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकणारा ठरेल, संपूर्ण टीमला शुभेच्छा', असं ट्विट समंथाने केलं. त्यावर नाग चैतन्यने 'थँक्स सॅम' असं उत्तर दिलं. या दोघांचं संभाषण पाहून त्यांच्या नात्यातील नाराजी सहजपणे दिसून येत असल्याचं चाहत्यांनी म्हटलंय. समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून 'अक्किनेनी' हे आडनाव काढून टाकलं, तेव्हापासून या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सुरुवात झाली. इतकंच नाही तर नुकत्याच पार पडलेल्या नागार्जुन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीलासुद्धा ती उपस्थित नव्हती. कौटुंबिक कार्यक्रमातील तिच्या अनुपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. समंथा आणि नाग चैतन्य यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी आता नागार्जुन प्रयत्न करत असल्याचं समजतंय.

घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप या दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र वैवाहिक आयुष्यातील मतभेद मिटवण्यासाठी समंथा आणि नाग चैतन्य हे सल्लागारांकडे आणि कौटुंबिक न्यायालयात गेल्याचंही म्हटलं जातं आहे. 'लव्ह स्टोरी' या चित्रपटाच्या शूटिंगपासून या दोघांमध्ये वाद सुरु झाले. साईसोबत नाग चैतन्यची जवळीक वाढल्याने वैवाहिक आयुष्यात समंथासोबत वाद सुरू झाले अशी चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT