Matka King Esakal
मनोरंजन

Matka King: नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग' वेब सीरिजची घोषणा; 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार भूमिका

Matka King: नागराज मंजुळे (Nagaraj Manjule) यांच्या मटका किंग (Matka King) या वेब सीरिजची घोषणा करण्यात आली आहे. या वेब सीरिजमध्ये कोणता अभिनेता मुख्य भूमिका साकारणार आहे? जाणून घेऊयात...

priyanka kulkarni

Matka King: विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अशताच अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मनं नुकतच चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओनं त्यांच्या आगामी वेब सीरिज आणि चित्रपटांची घोषणा केली आहे. यामध्ये नागराज मंजुळे (Nagaraj Manjule) यांच्या मटका किंग (Matka King) या वेब सीरिजचा समावेश आहे. नागराज मंजुळे यांच्या मटका किंग या वेब सीरिजमध्ये कोणता अभिनेता मुख्य भूमिका साकारणार आहे? जाणून घेऊयात...

'हा' अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका

काल (19 मार्च) मुंबईत प्राइम व्हिडीओचा भव्य इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये नागराज मंजुळेंच्या मटका किंग या वेब सीरिजची घोषणा करण्यात आली. अशताच या वेब सीरिजमधील कलारांच्या नावांची देखील घोषणा करण्यात आली. या वेब सीरिजमध्ये अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) प्रमुख भूमिका साकारणार आहे.

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मटका किंग या वेब सीरिजबाबत नुकतीच एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं, "मुंबईतील एक कापूस व्यापारी मटका नावाचा जुगार खेळ सुरू करतो आणि शहराला घेरतो"

रॉय कपूर फिल्म्स, आटपाट आणि एसएमआर प्रोडक्शन या प्रोडक्शन कंपनीनं मटका किंग या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. तसेच या वेब सीरिजचा सह निर्माता आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आहे. या वेब सीरिजचं लेखन अभय कोरणे आणि नागराज मंजुळे यांनी केलं आहे.

विजय वर्माचे चित्रपट आणि वेब सीरिज

विजय वर्माच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. विजय वर्मा हा मिर्झापूर-3 या वेब सीरिजमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पिंक, डार्लिंग्स आणि जाने जान या चित्रपटांमधील विजयच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच विजयनं लस्ट स्टोरीज-2, मर्डर मुबारक, गल्ली बॉयमध्ये देखील काम केलं आहे. आता विजयच्या मटका किंग या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Video: अंगाला भस्म अन् कुरळ्या केसांचा बाबा... ; राज ठाकरेंचे हावभाव चर्चेत, नाव न घेता कुणाला टोला?

लग्नसोहळा सुरू असतानाच अग्नितांडव, २२ जणांचा मृत्यू; इमारत जळून खाक, रस्त्याच्या एका बाजूला मृतदेह, दुसरीकडे जखमी लोक

५५ वर ALL OUT; तरीही हा 'शहाणा' म्हणतो, पाकिस्तान बेस्ट टीम अन् आशिया चषक जिंकणार! नेटकऱ्यांनी घेतलं फैलावर Video

Marathi News Live Updates : लाखोंच्या अनुदानात अपहार, महिला तलाठ्याला अटक

Teacher Award 2026: शाळेची पटसंख्या वाढवली, विद्यार्थ्यांना घडविले; संदीप शिंदेंचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव, शाळेचा केला कायापालट

SCROLL FOR NEXT