Nagraj Manjule and PSI Pallavi Jadhav Esakal
मनोरंजन

Nagraj Manjule-PSI Pallavi Jadhav: जेव्हा 'घर बंदुक बिरयानी' मधील 'राया' खऱ्या दंबग ऑफिसरला भेटतात...आणि मग..

Vaishali Patil

मराठी मनोरंजन विश्वात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणुन लोकप्रिय असणारे नागराज मंजुळे हे सध्या त्यांचा 'घर बंदुक बिरयानी' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. आज हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा त्याच्या पुर्ण टिमला आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागराज मंजुळे यांच्यासह चित्रपटातील प्रमुख कलाकार वेगवेगळ्या कार्यक्रमांना आणि इव्हेंट्सना हजेरी लावत आहे. त्याच्या 'घर बंदुक बिरयानी' चित्रपटात 'सैराट' फेम आकाश ठोसर, सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

यात नागराज मंजुळे हे एका रुबाबदार आणि धाडसी पोलिसाच्या भुमिकेत आपल्याला दिसणार आहेत. त्याचं या चित्रपटातील गाणी आणि त्याचे सीन्स प्रेक्षकांना खुपच आवडले आहेत. सध्या सोशल मिडियावर त्याचे व्हिडिओही व्हायरल होत आहे.

त्यातच नागराज मंजुळे यांनी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान खऱ्या खुऱ्या पोलिसांची भेट घेतली. विशेष म्हणजे त्याच्या या चित्रपटातही खरे पोलिस अभिनय करतांना दिसणार आहे.

दरम्यान त्यांनी सोशल मिडियावरील चर्चेतल आणि गाजलेलं व्यक्तिमत्व असलेल्या आणि दबंग महिला पोलीस अधिकारी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पल्लवी जाधव यांच्यासोबतही बराच वेळ घालवला. त्याचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

ज्यात त्याच्या चित्रपटातील 'हान की बडीव' या गाण्यावर पोलिसांची काठी उडवून, गोल फिरवतांनाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

त्यानंतर आता पीएसआय पल्लवी जाधव यांनी नागराज मंजुळे सोबतच काही फोटो शेअर करत खास पोस्ट शेअर केली आहे.

यात त्यांनी लिहिलयं की, नागराज मंजुळे सरांसोबत कॅरम आणि गप्पा

'आज पहिल्यांदा मी carrom खेळतेय. आणि तेही नागराज सरांच्या आग्रहास्तव. Carrom वगैरे मला काही माहीत नव्हतं पहिल्यापासुन. खेडे गावाकडे कुठं हे खेळ होते तेव्हा. मी शाळेत असतांना कबड्डी आणि खो-खो खेळणारी मुलगी. त्या दिवशी सर बोलले, चला मॅडम, एक डाव खेळुया.'

'मी प्रामाणीकपणे सांगीतलं कि, सर मला नाही येत खेळता, आजवर मी एकदाही खेळली नाही आणि या खेळाबद्दल मला बेसीक माहिती पण नाही. फक्त दुरुन पाहीलं आहे मी की, carrom नावाचा हा खेळ आहे. सर बोलले, सोप आहे एकदम, बसा तुम्ही,मी सांगतो.'

'आणि मग काय, मी सुरवात केली, आणि तुम्हाला माहीतंच आहे कि, आपण पण काही कमी नाही,महत्त्वाचं म्हणजे पाहता पाहताचं एका डावात मी एक गोटी पण काढली. आणि अशाप्रकारे सरांनी मला carrom शिकवुन champion बनवलं. आणि आता पुढच्या national carrom स्पर्धेत मी सहभाग नोंदवणार आहे.' यानंतर त्यांनी नागराज मंजुळे यांचे आभारही मानले आहे.

खऱ्या आयुष्यात दबंग महिला पोलीस अधिकारी म्हणून पल्लवी जाधव या ओळखल्या जातात. विषेश म्हणजे त्यांना मॉडेलिंगचाही छंद आहे. २०२० मध्ये जयपूर येथे पार पडलेल्या 'मिस ग्लॅमन इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेत त्या रनर अप ठरल्या होत्या. त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT