srk 
मनोरंजन

शाहरुख आणि दीपिकाच्या 'सोशल डिस्टन्सिंग' पोस्टरची सोशल मिडीयामध्ये तुफान चर्चा..नागपुर पोलिसांचं मजेशीर ट्वीट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- संपूर्ण जगात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे..सगळ्या देशांचे मिळून आत्तापर्यंत १२ लाख एवढे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत..या संसर्गापसून वाचण्यासाठी सर्व देश सोशल डिस्टन्सिंगचा आधार घेत आहेत..आपल्या देशातही २१ दिवसांचं लॉकडाऊन सुरु आहे..याच सोशल डिस्टन्सिंगबद्दल समजवण्यासाठी नागपुर पोलिसांनी एक मजेशीर युक्ती केलीये..त्यांनी ट्वीट करुन शाहरुख आणि दीपिकाचं एक पोस्टर शेअर केलं आहे..हे पोस्टर आता सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे..

नागपुर पोलिसांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण यांच्या एका सिनेमाची मदत घेऊन सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत आवाहन केलं आहे..ट्वीटरवर शाहरुख आणि दीपिकाचा हिट सिनेमा चेन्नई एक्सप्रेसचं पोस्टर नागपुर पोलिसांनी अपलोड केलंय..या पोस्टरमध्ये दीपिका आणि शाहरुख एका बाकावर बसलेले आहेत मात्र दोघेही एका बाकावर असूनही एकमेकांपासून खूप अंतर ठेवून बसले आहेत..पोलिसांद्वारे पोस्ट केल्या गेलेल्या या पोस्टरवर दोघांमधील अंतरामध्ये सोशल डिसन्सिंग असं लिहिलं आहे..

हे पोस्टर ट्वीट करताना नागपुर पोलिसांनी लिहिलं आहे, ' सोशल डिस्टन्सिंगच्या ताकदीला कमी समजू नका'. पोलिसांचं हे ट्वीट नेटक-यांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे..आता यावर मजेदार प्रतिक्रिया देखील येत आहेत..एका नेटक-याने लिहिलंय की, 'हे सगळ्यात भारी आहे' तर दुस-याने 'सो कुल, आशा करुया की लोकं हे समजतील आणि याची अंमलबजावणी करतील.'

'चेन्नई एक्सप्रेस'मध्ये 'डोन्ट अन्डरएस्टिमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन' हा शाहरुखचा प्रसिद्ध डायलॉग होता...याचा अर्थ 'सामान्य माणसाच्या ताकदीला कमी समजू नका' असा होतो..याच डायलॉगचा वापर करत सोशल डिस्टन्सिंग बद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी नागपुर पोलिसांनी ही शक्कल लढवत 'सोशल डिस्टन्सिंगच्या ताकदीला कमी समजू नका' असं कॅप्शन दिलंय जे सध्या सोशल मिडीयामध्ये व्हायरल होतंय..

nagpur police tweets shah rukh khan and deepika padukone chennai express movie poster

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: अहिल्यानगरमध्ये मोठा अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल झाले, ९ वाहनांना धडक दिली अन्...; भीषण घटना

Paralysis Warning Signs : पॅरालिसिसचा झटका येण्याआधी शरीरात दिसतात 'हे' 2 बदल; चुकूनही करू नका दुर्लक्ष, नाहीतर जीव गमवाल

Pooja Khedkar: पुजा खेडकर कुटुंबाचा नवा वाद! नवी मुंबईतील अपहरणकर्ता पुण्यातील घरी आढळला, पोलिसांचा तपास सुरू...

Latest Marathi News Updates: ठाकरे गटाच्या खासदारांनी धाराशिव येथे पाकिस्तानचे झेंडे फडकवले - चंद्रशेखर बावनकुळे

Dhule News : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे बोगस डॉक्टरांवर कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT