Nagaraj Manjule Anurag Kashyap New Movie Kasturi the musk :  esakal
मनोरंजन

Kasturi Movie : 'स्वच्छतादिना'च्या निमित्तानं नागराजनं अनुराग कश्यपसोबत केली मोठी घोषणा! 'आता लवकरच...'

नागराज मंजुळे हे मराठी चित्रपट क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. त्याच्या यापूर्वीच्या विविध कलाकृतींना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

युगंधर ताजणे

Nagaraj Manjule Anurag Kashyap New Movie Kasturi the musk : मराठी आणि हिंदी चित्रपट विश्वामध्ये आपल्या नावाची ठळक ओळख निर्माण कऱणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये आता नागराज मंजुळेचे नाव घेतले जाते. दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित झालेल्या या दिग्दर्शकानं आज स्वच्छतादिनाच्या निमित्तानं एक नवी पोस्ट शेयर केली आहे.

यावेळी नागराज सोबत बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप यानंही प्रेझेंटर म्हणून या चित्रपटामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. नागराजनं इंस्टावर पोस्ट शेयर करुन त्याविषयी माहिती दिली आहे. त्या पोस्टमध्ये तो म्हणतो आज स्वच्छतादिनाच्या निमित्तानं तुमच्यासाठी खास घेऊन येत आहोत कस्तुरी नावाचा चित्रपट. ही कथा अशा व्यक्तींची आहे ज्यांनी स्वच्छतेसाठी आपल्या आयुष्याची फार मोठी किंमत चुकवली आहे.

नागराज मंजुळे हे मराठी चित्रपट क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. त्याच्या यापूर्वीच्या विविध कलाकृतींना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. याच वर्षी नागराजचा घर बंदूक बिरयानी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याअगोदर त्यानं बिग बी अमिताभ बच्चन यांना घेऊन झुंड नावाचा चित्रपट केला होता. त्याचेही प्रेक्षकांनी, चाहत्यांनी कौतुक केले होते.

नागराजनं अनेक मराठी चित्रपटांची निर्मितीही केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा बापमाणूस नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सोशल मीडियावरुन अनेकांनी त्याचे कौतुक केले होते. यासगळ्यात त्याच्या आगामी कस्तुरी चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. नागराज हा त्याच्या चित्रपटाचा विषय, त्याची मांडणी, सादरीकरण आणि संवाद यासाठी ओळखला गेलेला दिग्दर्शक आहे. त्यामुळे त्याच्या नव्या चित्रपटाची चाहत्यांना कमालीची उत्सुकता असते.

भारताला ऑलंम्पिकमध्ये पहिले गोल्ड मेडल मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर बायोपिकची निर्मिती नागराज करतो आहे. त्यानं यापूर्वी त्याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. त्या प्रोजेक्टविषयी चर्चा सुरु झाली असून त्याची चाहत्यांना उत्कंठा आहे. आता त्याची निर्मिती असलेला जो कस्तुरी नावाचा चित्रपट येतो आहे त्याचे दिग्दर्शन विनोद कांबळे यांनी केले आहे. त्यांच्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT