Dhanush And Jhund
Dhanush And Jhund esakal
मनोरंजन

Jhund Movie: नागराजचा झुंड 'मास्टरपीस' कौतूक करताना धनुषला...

युगंधर ताजणे

Nagraj Manjule: नागराज मंजुळेच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचं उद्या दणक्यात प्रदर्शन होणार आहे. त्याचा पहिला बॉलीवूडपट झुंड उद्या (Jhund Movie) प्रदर्शित होतो आहे. त्यापूर्वी झालेल्या स्क्रिनिंगवरुन (Bollywood Movies) अनेक सेलिब्रेटींनी नागराजच्या झुंडवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. काल बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं (Aamir Khan) नागराजच्या फिल्मवर दिलखुलास प्रतिक्रिया दिली होती. त्यानं आपण गेल्या तीस वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करत आहे. मात्र नागराजनं जी फिल्म तयार केली आहे त्यातून त्यानं आम्हाला फुटबॉलप्रमाणे उडवून लावलं आहे. अशी बेधडक प्रतिक्रिया त्यानं दिली होती. त्यानंतर साऊथचा सुपरस्टार धनुषनं देखील नागराजचा झुंड पाहिला त्यानंतर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

4 मार्च पासून नागराजचा झुंड देशभर प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी त्याच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मराठी भाषांमध्ये आपला आगळावेगळा ठसा उमटविणाऱ्या नागराजच्या झुंडची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. गेल्या दोन वर्षांपासून नागराजच्या झुंडची चाहते वाट पाहत आहेत. मराठीनंतर नागराज आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करतो आहे. त्याच्या पहिल्याच हिंदी चित्रपटामध्ये बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) काम करणार आहे. त्यांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. झोपडपट्टीतील मुलांचे भावविश्व, त्यांचा संघर्ष आणि त्यांची फुटबॉल टीम हा प्रश्न झुंडमधून मांडण्यात आला आहे.

झुंडवर धनुषनं प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, मला नागराजचा सिनेमा फारच प्रभावित करुन गेला. खासकरुन त्यातील मुलांनी केलेल्या अभिनयाचं मला फार कौतूक आहे. अमिताभ यांचे काम तर जबरदस्त असेच आहे. नागराजच्या टीमचे मी मनापासून कौतूक करतो. त्यानं जे काही तयार केले आहे तो मास्टरपीस म्हणावा असचं आहे. या शब्दांत धनुषनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. धनुषचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT