nagraj manjule reveal of theft case, his national award for fandry movie has theft sakal
मनोरंजन

Nagraj Manjule: नागराज मंजुळे यांना मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार चोरीला.. आता उघडकीस आली संपूर्ण घटना..

एका मुलाखतीत नागराज मंजुळे यांनी केला गौप्यस्फोट..

नीलेश अडसूळ

Nagraj Manjule: फॅन्ड्री, सैराट, नाळ, झुंड आदी दर्जेदार चित्रपटांच्या माध्यमातून समाजातील वंचितांचे प्रश्न समोर आणणारे त्यावर सडेतोडपणे भाष्य करणारे एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणजे नागराज पोपटराव मंजुळे.

नागराज सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. त्यांच्या पोस्टकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. कालच त्यांचा 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पण याच चित्रपटाच्या निमित्ताने नागराजने एका मुलाखतीत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेळ नागराज यांना मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला आहे. याबाबत त्यांनी एका मुलाखतीत सविस्तर सांगितले.

(nagraj manjule reveal of theft case, his national award for fandry movie has theft)

नागराज मंजुळे यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये सर्वोच्च अशा राष्ट्रीय पुरस्काराचाही समावेश आहे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, नागराज यांना 'पिस्तुल्या' या लघुपटासाठी मिळालेला पहिला राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला आहे.

हा प्रकार नेमका काय आहे याविषयी नागराज एका मुलाखतीत बोलले आहेत. नागराज म्हणाले, ' फॅन्ड्री सिनेमाच्या शूटिंगमध्ये आम्ही व्यग्र होतो. सिनेमाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे आई आणि भाऊसुद्धा सेटवर आले होते. घरात कोणीही नव्हतं. हीच संधी साधत चोराने घरात डल्ला मारला आणि नेमका माझा राष्ट्रीय पुरस्कारही त्याने चोरला.'

पुढे ते म्हणाले, 'मी त्या चोराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. कारण मी त्याला शोधत बसलो असतो, तर माझं पुढचं काम मला लक्ष देऊन करता आलं नसतं. त्याचा परिणाम माझ्या आगामी चित्रपटांवर झाला असता. आणि तसंही मला मिळालेली ट्रॉफी चोरीला गेली आहे, पण तो पुरस्कार तर माझ्याच नावावर नोंद आहे. त्यामुळे मला गोष्टींचा फारसा पडत नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT